महाराष्ट्राला मिळणार सुमारे 1 लाख कोटी विकसित भारताकडे दमदार पाऊल : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर जावळी तालुक्यातील जनतेचा पुर्ण विश्वास त्यामुळे कुसुंबी जिल्हा परिषद गटात शिवसेनेच्या अधिकृत उमेदवार कविता एकनाथ ओंबळे यांचा विजय निश्चित-एकनाथदादा ओंबळे केळघर–शिर्डी साई पालखी व दिंडी सोहळ्याचे आयोजन शिवरायांच्या गडकोटांचे संवर्धन करण्याची जबाबदारी आजच्या तरुणाईवर : श्री.गणेश शिंदे राष्ट्रीय सेवा योजना हा फक्त उपक्रम नसून ती एक प्रबोधनाची चळवळ-श्री. देवेंद्र कदम आदरणीय स्व.अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली
Home » देश » दिल्लीत लाल किल्ल्याबाहेरील स्फोटात ८ ठार

दिल्लीत लाल किल्ल्याबाहेरील स्फोटात ८ ठार

दिल्लीत लाल किल्ल्याबाहेरील स्फोटात ८ ठार

दिल्ली- दिल्लीतील लाल किल्ल्याच्या बाहेर असलेल्या मेट्रो स्टेशनच्या बाहेर सोमवारी संध्याकाळच्या सुमारास एका कारमध्ये मोठा स्फोट झाल्याची घटना समोर आली आहे. या स्फोटानंतर दिल्लीसह देशातील अनेक भागांमध्ये अलर्ट जारी करण्यात आला आहे. या कारच्या स्फोटानंतर जवळपासची काही वाहने देखील जळून खाक झाली आहेत. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, हा स्फोट इतका भीषण होता की यामुळे परिसरातील रस्त्यावरील दिवे देखील बंद झाले.

सोमवारी (१० नोव्हेंबर २०२५) संध्याकाळी ६ वाजून ५५ मिनिटांनी जुन्या दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या बाहेर एका कारमध्ये स्फोट झाल्याची माहिती मिळाली. या स्फोटामुळे अनेक वाहनांना आग लागली. प्राथमिक अहवालानुसार, या घटनेत आठ जणांचा मृत्यू झाला असून, अनेक जण जखमी झाले आहेत.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीतील लाल किल्ला मेट्रे स्टेशनच्या गेट नंबर १ च्या बाहेर हा स्फोट झाला. हे ठिकाण दिल्ली गेटला काश्मिरी गेटशी जोडणाऱ्या रस्त्यावर असून हा परिसर चांदणी चौकाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या अगदी जवळ आहे. हा जामा मशिदीपासून सुमारे १.५ किलोमीटर अंतरावर असलेला अत्यंत गजबजलेला भाग आहे. जुन्या दिल्लीतील अत्यंत गर्दीच्या ठिकाणी सोमवारी संध्याकाळी ही घटना घडल्याने याचे गांभीर्य वाढले आहे.

स्फोटाच्या ठिकाणी अग्निशमन दलाची वाहने आणि दिल्ली पोलीस स्पेशल सेलच्या अधिकाऱ्यांसह पोलीस पथके दाखल झाली आहेत. तसेच जखमींना एलएनजेपी रुग्णालयात नेण्यात आले आहे.

या घटनेत मृत्यू झालेल्या नागरिकांची संख्या वाढली असून किमान ८ जणांचा या घटनेत मृत्यू झाला आहे. तर इतर १२ जण जखमी झाले आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी या स्फोटाच्या घटनेनंतर तात्काळ दिल्ली पोलीस आयुक्तांशी चर्चा केला. एनएसजी (NSG), एनआयए (NIA), आणि फॉरेन्सिक विभागाचे पथक तातडीने घटनास्थळी रवाना करण्यात आले आहेत. दिल्लीतील या घटनेसंदर्भात गृहमंत्री आयबी संचालकांच्या (IB Director) सतत संपर्कात आहेत, असे वृत्त एएनआयने दिले आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

महाराष्ट्राला मिळणार सुमारे 1 लाख कोटी विकसित भारताकडे दमदार पाऊल : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्राला मिळणार सुमारे 1 लाख कोटी विकसित भारताकडे दमदार पाऊल : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई, दि. १:- पंतप्रधान नरेंद्र मोदीजी

Live Cricket