Home » देश » भारतातील ‘स्टार्ट-अप कॅपिटल’ : महाराष्ट्र!

भारतातील ‘स्टार्ट-अप कॅपिटल’ : महाराष्ट्र!

भारतातील ‘स्टार्ट-अप कॅपिटल’ : महाराष्ट्र!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबई येथे एसएनडीटी महिला विद्यापीठ, मुंबई द्वारे आयोजित व केंद्रीय शिक्षण मंत्रालय आणि राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या सहकार्याने ‘इनोव्हेशन महाकुंभ 2025’ चे उदघाटन पार पडले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी ‘यंग इनोव्हेटर अवॉर्ड्स’ स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिसांचे वितरण केले आणि ‘प्री-इनक्युबेशन सेंटर’ चे उदघाटन केले. 

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी 1916 साली एसएनडीटी महिला विद्यापीठाची स्थापना केली आणि युनायटेड किंगडममध्ये महिलांना मतदानाचा हक्क त्यानंतर 2 वर्षांनी, 1918 मध्ये मिळाला. म्हणजे जगावर राज्य करणाऱ्या विकसित राष्ट्रालाही लोकशाहीतील महिलांच्या सहभागाचे महत्त्व समजायला जिथे 2 वर्ष लागली तिथे, भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी हे आधीच ओळखले होते की, एखादे राष्ट्र विकसित व्हायचे असेल तर महिलांचा सशक्त सहभाग आवश्यक आहे.

आजच्या युगात नवकल्पना हे एकमेव साधन आहे, ज्यामुळे आपण झपाट्याने प्रगती करू शकतो. नवकल्पना म्हणजे लोकांच्या जीवनात बदल घडवणे, त्यांचे आयुष्य सुलभ करणे, नवकल्पना म्हणजे लोकांच्या आयुष्यात प्रभाव टाकणाऱ्या कल्पना वास्तवात आणणे. आजच्या स्टार्ट-अपच्या युगात प्रत्येक व्यक्तीकडे कल्पक होण्याची, उद्योजक होण्याची आणि स्वतःचे जीवन बदलण्याची संधी आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. 

महाराष्ट्र शासनाने आपले नवीन स्टार्ट-अप, इनोव्हेशन आणि उद्योजकता धोरण जाहीर केले आहे. या धोरणाचा उद्देश अधिकाधिक इन्क्युबेटर्स निर्माण करणे, नवीन प्लॅटफॉर्म तयार करणे आणि उद्योजक घडवणे हा आहे. या माध्यमातून नवकल्पनांना आणि स्टार्ट-अप्सना पाठबळ दिले जाते. त्यामुळे आज अनेक स्टार्ट-अप्स मोठ्या उद्योगांमध्ये रूपांतरित झाले आहेत, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014 मध्ये स्टार्ट-अप इंडिया ही संकल्पना मांडली. त्या संकल्पनेमुळे आज भारत जगातील तिसरा सर्वात मोठा स्टार्ट-अप इकोसिस्टम बनला आहे आणि आता आपण दुसऱ्या क्रमांकाकडे झपाट्याने वाटचाल करत आहोत, असे बोलून मुख्यमंत्री फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले. 

महाराष्ट्र हे देशाचे खरे ‘स्टार्टअप कॅपिटल’ आहे. महाराष्ट्र शासनाने स्टार्ट-अप धोरणात महिला-नेतृत्व असलेल्या स्टार्ट-अप्सना विशेष प्राधान्य दिले आहे, कारण जर महाराष्ट्राला ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था आणि भारताला पाच ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था बनवायचे असेल, तर महिलांचा सहभाग निर्णायक ठरणार आहे. महाराष्ट्रातील एकूण स्टार्ट-अप्सपैकी 45% स्टार्ट-अप्स हे महिला नेतृत्वाखाली आहेत, त्यामुळे लवकरच महिला या क्षेत्रात आघाडीवर असतील असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. 

यावेळी मंत्री मंगलप्रभात लोढा, एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या कुलगुरु प्रा. उज्ज्वला चक्रदेव आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

सातारा जिल्ह्यातील वाई नगरपरिषदेचा गड जिंकला; दिलेले प्रत्येक वचन पूर्ण करणार – मंत्री जयकुमार गोरे

Post Views: 18 सातारा जिल्ह्यातील वाई नगरपरिषदेचा गड जिंकला; दिलेले प्रत्येक वचन पूर्ण करणार – मंत्री जयकुमार गोरे सातारा :

Live Cricket