कुडाळ गटात भाजपच्या सौ जयश्रीताई गिरीचां प्रचाराचा झंझावात साताऱ्याच्या अस्मितेला सुरेल सलाम’आम्ही सातारी’ गीताचा मंगळवारी शाहू कलामंदिरात भव्य प्रकाशन सोहळा कोडोलीच्या सुपुत्राचा राष्ट्रीय स्तरावर गौरव; उस्मानाबादी शेळी संवर्धनासाठी ‘NBAGR’ कडून विशेष सन्मान  कुंभरोशी गणात ‘कमळ’ फुलणार? सामाजिक कार्याचा वारसा अन् दांडगा अनुभव असलेले सुरेश जाधव रिंगणात! गौरीशंकर सुखात्मे स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न विद्यार्थ्यांच्या कलाविष्काराचे रसिक प्रेक्षकांकडून झाले कौतुक  लढायचं परिवर्तनासाठी, लढायचं विकासासाठी! – श्री. सुभाष महादेव सोंडकर यांना भाजपची अधिकृत उमेदवारी
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » उद्योगजगत » महाबळेश्वरात मंत्री मकरंद आबांची एंट्री आणि शहरातील राजकारणात हलचल राष्ट्रवादीची तयारी शिगेला

महाबळेश्वरात मंत्री मकरंद आबांची एंट्री आणि शहरातील राजकारणात हलचल राष्ट्रवादीची तयारी शिगेला

महाबळेश्वरात मंत्री मकरंद आबांची एंट्री आणि शहरातील राजकारणात हलचल राष्ट्रवादीची तयारी शिगेला

महाबळेश्वर प्रतिनिधी -महाबळेश्वर नगरपालिका निवडणूक २०२५ जवळ येत असताना राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवार निवडीची प्रक्रिया वेगात सुरु केली आहे.मदत आणि पुनर्वसन मंत्री ना. मकरंदआबा पाटील शनिवारी महाबळेश्वरात दाखल झाल्याने शहरातील राजकीय समीकरणांना नवाच जोश आला. ईश्वर इन येथे दिवसभर चाललेल्या मुलाखत फेरीमुळे परिसर अक्षरश: राजकीय केंद्रबिंदू बनला होता.

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते किसन शेठ शिंदे, राजेंद्र राजपुरे, संजय गायकवाड आणि प्रविण भिलारे यांच्या उपस्थितीत उमेदवारांच्या मुलाखती सुरू झाल्यानंतर प्रभागनिहाय इच्छुकांची व समर्थकांची दणदणीत गर्दी उसळली. प्रत्येक गटाकडून शक्तिप्रदर्शन, बॅनर, घोषणा आणि दाखल झालेले ताफे पाहून निवडणुकीचा पट आता जोरदार रंगात आल्याचे स्पष्ट झाले.

दरम्यान, महाबळेश्वरातील राजकीय हालचालींना गती आली आहे. शिंदे गटाच्या शिवसेनेने कुमार शिंदे यांच्या नेतृत्वाखाली स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) विरोधात एकजुटीची रणनीती आखली जात असल्याची चर्चा आहे. त्याचवेळी शिवसेना (उद्धव ठाकरे गट) हे ना.पाटील यांच्या संपर्कात असून, गोपनीय चर्चांची कुजबुज राजकीय वर्तुळात वाढली आहे.

याशिवाय डी.एम. बावळेकर आणि राजेश कुंभारदरे यांनी ‘लोकमित्र जनसेवा आघाडी’ सक्रिय करण्याचे प्रयत्न वेगात केले आहेत. योग्य सन्मान मिळाल्यास ही आघाडी राष्ट्रवादीसोबत जाण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, त्यामुळे समीकरणांना नवी कलाटणी मिळू शकते.

ना. मकरंद आबा पाटील यांच्या अलीकडच्या कार्यशैलीमुळे आणि संघटन बळकटीकरणामुळे महाबळेश्वरातील त्यांचे राजकीय वर्चस्व अधिक ठळकपणे जाणवत आहे. मागील निवडणुकीत नगराध्यक्षा स्वप्नाली शिंदे यांच्या पक्षांतरामुळे सत्ता हातातून गेल्यानंतर यंदा ‘पुनरागमन’ करण्यासाठी राष्ट्रवादी आक्रमकपणे पावले टाकताना दिसत आहे.

नगराध्यक्षपदासाठीही शर्यत रंगतदार झाली आहे. लोकमित्र आघाडीतून डी.एम. बावळेकर दमदार तयारीत आहेत, तर राष्ट्रवादीकडून सुनील शिंदे आणि नासीर मुलाणी या दोघांचीही इच्छुक यादीत जोरदार चर्चा सुरू आहे.

शनिवारच्या रात्री उशीरा संपलेल्या मुलाखत प्रक्रियेनंतर ईश्वर इन परिसरात राजकीय ताप आणखी वाढला. राष्ट्रवादीकडून अंतिम उमेदवारी कोणाच्या नावावर थांबते, याकडे संपूर्ण महाबळेश्वरचे लक्ष लागले आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

कुडाळ गटात भाजपच्या सौ जयश्रीताई गिरीचां प्रचाराचा झंझावात

कुडाळ गटात भाजपच्या सौ. जयश्रीताई गिरीचां प्रचाराचा झंझावात मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा विश्वास सार्थ ठरवत विजयश्री खेचून आणणार सातारा:जावली तालुक्यात

Live Cricket