Home » राज्य » मलकापूर नगरपरिषद निवडणूक काँग्रेस पक्ष ताकदीने लढवणार, प्रभागनिहाय चाचपणी सुरु – नामदेवराव पाटील

मलकापूर नगरपरिषद निवडणूक काँग्रेस पक्ष ताकदीने लढवणार, प्रभागनिहाय चाचपणी सुरु – नामदेवराव पाटील

मलकापूर नगरपरिषद निवडणूक काँग्रेस पक्ष ताकदीने लढवणार, प्रभागनिहाय चाचपणी सुरु – नामदेवराव पाटील

कराड : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक जाहीर झाल्या असून मलकापूर नगरपरिषदेची निवडणूक काँग्रेस पक्ष ताकदीने लढवणार असल्याचे प्रतिपादन कराड दक्षिण काँग्रेस कमिटी अध्यक्ष नामदेवराव पाटील यांनी व्यक्त केले. मलकापूरचे उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांनी पक्ष सदस्य पदाचा राजीनामा दिला असल्याने मलकापूर शहरात निर्माण झालेल्या आकस्मिक परिस्थितीला सामोरे जात आगामी निवडणूक काँग्रेस पक्ष ताकदीने लढवणार असून यासाठी मित्र पक्षांसोबत चर्चा करून समन्वयाने निर्णय घेतला जाईल असेही नामदेवराव पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. 

मलकापूर शहराचा नियोजनबद्ध विकास हा आदरणीय पृथ्वीराज चव्हाण (बाबा) यांच्याच दूरदृष्टीने झालेला आहे. यामध्ये देशभर नावलौकिक मिळवलेली मलकापूरची २४ बाय ७ पाणीपुरवठा योजना असेल, ड्रेनेज सुविधा, मलकापूर नगरपरिषदेची सुसज्ज इमारत अंतर्गत रस्ते तसेच याचप्रमाणे शहराचा नियोजनबद्ध विकास अशा अनेक योजना आदरणीय पृथ्वीराज बाबांच्या माध्यमातून मलकापूर शहरात राबविल्या गेल्या. 

मलकापूरचे आणि पृथ्वीराज बाबांचे जिव्हाळ्याचे नाते आहे. त्यामुळे मलकापूर नगरपालिकेची निवडणूक पृथ्वीराज बाबांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेस पक्ष ताकदीने लढेल तसेच मलकापूर शहरात प्रभागनिहाय चाचपणी सुरु असून अनेक इच्छुकांनी पक्षाकडून निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली आहे. तसेच मलकापूर शहरातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी अशा परिस्थितीत पक्षाच्या पाठीशी ताकदीने साथ देण्याचे आवाहन सुद्धा यावेळी कराड दक्षिण काँग्रेसचे अध्यक्ष नामदेवराव पाटील यांनी केले.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

सातारा जिल्ह्यातील वाई नगरपरिषदेचा गड जिंकला; दिलेले प्रत्येक वचन पूर्ण करणार – मंत्री जयकुमार गोरे

Post Views: 36 सातारा जिल्ह्यातील वाई नगरपरिषदेचा गड जिंकला; दिलेले प्रत्येक वचन पूर्ण करणार – मंत्री जयकुमार गोरे सातारा :

Live Cricket