“सक्सेस ॲबॅकस च्या नवीन भव्य कार्यालयाचे उद्घाटन शिक्षण क्षेत्रात नवा टप्पा विद्यार्थ्यांच्या सर्वागीण विकासासाठी आणखी एक पाऊल
सातारा :विद्यार्थ्यांच्या गणिताविषयीची आवड वाढवून त्यांचा आत्मविश्वास बळकट करण्यासाठी कार्यरत असलेल्या सक्सेस अबॅकस अँड एज्युकेशन इंडिया प्रा. लि. या महाराष्ट्रातील अग्रगण्य शैक्षणिक संस्थेच्या नवीन कार्यालयाचे भव्य उद्घाटन रविवार, दि. २ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजता, जुना RTO चौक, सदरबझार, सातारा येथे संपन्न होणार आहे.
या शुभ प्रसंगी उद्घाटन सोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणून मा. श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले (मंत्री, सार्वजनिक बांधकाम विभाग, महाराष्ट्र राज्य) उपस्थित राहणार आहेत.
सक्सेस अॅबॅकस ही संस्था गेली अनेक वर्षे “अॅबॅकस” आणि “वेदिक मॅथ्स” च्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये गणित सुलभ, सोपे आणि आनंददायी बनविण्याचे ध्येय घेऊन कार्यरत आहे. संस्थेच्या ५०० पेक्षा अधिक शाखा कार्यरत आहेत, संस्थेच्या माध्यमातून आजवर ३५,००० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी प्रशिक्षण घेतले असून, अनेकांनी राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील विविध शालेय स्पर्धांमध्ये उल्लेखनीय यश संपादन केले आहे. काही विद्यार्थ्यांनी वर्ड रेकॉर्ड देखील केले आहेत संस्थेने आयोजित केलेले विविध वर्कशॉप्स, ट्रेनिंग प्रोग्रॅम्स आणि विविध शैक्षणिक उपक्रम हे विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासाबरोबरच त्यांचा व्यक्तिमत्व विकास घडवतात.
१६०० स्क्वेअर फुट जागेमध्ये उभारलेले अद्यावत सुविधा असलेले नवीन कार्यालय उभारण्यामागचा उद्देश सर्व शाखाधारक, पालक विद्यार्थी, यांना सर्वोत्तम सेवा देत्ता यावी, आणि अधिकाधिक विद्यार्थ्यांपर्यंत गुणवत्तापूर्ण अॅबॅकसचे शिक्षण पोहोचविणे हा आहे.

हे नवीन कार्यालय आमच्या या शैक्षणिक प्रवासातील एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरणार आहे.” असे संस्थेचे CEO श्री.किरण पाटील यांनी सांगितले.
या उद्घाटन सोहळ्याचे औचित्य साधून सर्व पालक, विद्यार्थी, माजी विद्यार्थी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन सक्सेस अँबॅकस परिवारातर्फे करण्यात आले आहे.




