कुडाळ गटात भाजपच्या सौ जयश्रीताई गिरीचां प्रचाराचा झंझावात साताऱ्याच्या अस्मितेला सुरेल सलाम’आम्ही सातारी’ गीताचा मंगळवारी शाहू कलामंदिरात भव्य प्रकाशन सोहळा कोडोलीच्या सुपुत्राचा राष्ट्रीय स्तरावर गौरव; उस्मानाबादी शेळी संवर्धनासाठी ‘NBAGR’ कडून विशेष सन्मान  कुंभरोशी गणात ‘कमळ’ फुलणार? सामाजिक कार्याचा वारसा अन् दांडगा अनुभव असलेले सुरेश जाधव रिंगणात! गौरीशंकर सुखात्मे स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न विद्यार्थ्यांच्या कलाविष्काराचे रसिक प्रेक्षकांकडून झाले कौतुक  लढायचं परिवर्तनासाठी, लढायचं विकासासाठी! – श्री. सुभाष महादेव सोंडकर यांना भाजपची अधिकृत उमेदवारी
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » ऑटोमोबाईल » मुंबईकरांचा प्रवास होणार एकदम ‘बेस्ट’मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बेस्टच्या पर्यावरणस्नेही 157 वातानुकूलित इलेक्ट्रीक बसगाड्यांचे लोकार्पण संपन्न झाले.

मुंबईकरांचा प्रवास होणार एकदम ‘बेस्ट’मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बेस्टच्या पर्यावरणस्नेही 157 वातानुकूलित इलेक्ट्रीक बसगाड्यांचे लोकार्पण संपन्न झाले. 

मुंबईकरांचा प्रवास होणार एकदम ‘बेस्ट’मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बेस्टच्या पर्यावरणस्नेही 157 वातानुकूलित इलेक्ट्रीक बसगाड्यांचे लोकार्पण संपन्न झाले. 

मुंबई -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, या बसगाड्यांमुळे मुंबईकरांची सोय होणार आहे तसेच पर्यावरणावर एमिशनचा होणारा परिणामही कमी होणार आहे. तसेच मुंबईकरांचा प्रवास अधिक सुकर व्हावा आणि संपूर्ण पब्लिक ट्रान्सपोर्टचा प्रवास प्रदूषणमुक्त व्हावा, यासाठी 5000 इलेक्ट्रीक बसगाड्यांच्या वितरणाचा निर्णय घेण्यात आला. टप्प्याटप्प्याने या बसगाड्या लोकसेवेसाठी रुजू होतील, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी संगितले. 

बेस्टची वाहतूक सेवा मुंबईची जीवन वाहिनी आहे. मुंबई मेट्रो, उपनगरीय लोकल ट्रेन यांसारख्या सेवांवर जास्त ताण येऊ नये, यासाठी बससेवा अधिक बळकट करू, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.जगात प्रत्येक महानगरमध्ये बससेवा महत्त्वाची भूमिका बजावते आणि त्यामुळे बेस्टच्या विकासासाठी आणि बळकटीसाठी बीएमसीने निधी उपलब्ध करून दिला. तसेच बससेवेमध्ये काम करणार्‍या कर्मचार्‍यांचा विचार करून त्यांची उर्वरित देणी आणि बोनस यासंदर्भात आयुक्तांशी संवाद साधून निधी उपलब्ध करून दिला, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी संगितले.

आपण सुरू केलेल्या सिंगल तिकिटिंगच्या माध्यमातून विकासासाठी अधिक निधी उपलब्ध होऊ शकतो. त्याचप्रमाणे 40 % हून आधिक ‘नॉन फेयरबॉक्स’ रेवेन्यूसाठी मुंबईसारख्या शहरामध्ये खूप मोठी संधी आहे त्याचा उपयोग झाला पाहिजे, जेणेकरून आपली बेस्ट आपल्या पायावर उभी राहून अधिक बळकट होईल, त्यासंदर्भात राज्य सरकार आणि बीएमसीकडून लागणारी सर्वतोपरी मदत करू, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

यावेळी विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री मंगलप्रभात लोढा, मंत्री ॲड. आशिष शेलार व इतर मान्यवर उपस्थित होते.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

कुडाळ गटात भाजपच्या सौ जयश्रीताई गिरीचां प्रचाराचा झंझावात

कुडाळ गटात भाजपच्या सौ. जयश्रीताई गिरीचां प्रचाराचा झंझावात मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा विश्वास सार्थ ठरवत विजयश्री खेचून आणणार सातारा:जावली तालुक्यात

Live Cricket