Home » ठळक बातम्या » महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी पारदर्शक तपास सुरु-रुपाली चाकणकर

महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी पारदर्शक तपास सुरु-रुपाली चाकणकर

महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी पारदर्शक तपास सुरु-रुपाली चाकणकर

सातारा : फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणाची पोलीस विभाग व फॉरेन्सिक लॅब असे सर्व विभाग पारदर्शकपणे तपास करत असून, राज्य महिला आयोग स्वतः यावर लक्ष ठेवून आहे, असे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी सांगितले.

श्रीमती चाकणकर यांनी फलटण उपजिल्हा रुग्णालयात जावून घटने विषयी सखोल चौकशी केली. यावेळी आमदार सचिन पाटील, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. युवराज करपे, उपविभागीय पोलीस अधीक्षक विशाल खांबे, महिला व बाल विकास अधिकारी शिल्पा पाटील यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

आत्महत्या प्रकरणाची पडताळणी करण्यासाठी फॉरेन्सिक लॅब आणि लोकेशन डिटेक्शनची मदत घेतली जात आहे. तपासामध्ये कुठल्याही प्रकारची कमतरता राहणार नाही, असे सांगून शासकीय, अशासकीय आस्थापनांमधील अंतर्गत तक्रार निवारण समित्या प्रभावीपणे काम करतात की नाही यासाठी या समित्यांचे वर्षातून दोन वेळा ऑडिट व्हावे असे निर्देशितही महिला आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती चाकरणकर यांनी दिले.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी पारदर्शक तपास सुरु-रुपाली चाकणकर

Post Views: 126 महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी पारदर्शक तपास सुरु-रुपाली चाकणकर सातारा : फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणाची

Live Cricket