पिंपरी-चिंचवड हादरले! पत्नीनेच केला पतीचा खून — नगरसेवक होण्याच्या स्वप्नाने घेतला भयानक वळण
पिंपरी-चिंचवड – शहरात नकुल भोईर (Nakul Bhoir) हत्याकांड प्रकरणात नवीन आणि धक्कादायक माहिती समोर आली आहे. नगरसेवक होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या पत्नीनेच पतीचा गळा आवळून खून केल्याचे उघड झाल्याने शहरभर खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हत्येच्या आधी दोघांनी एकत्र दारूची पार्टी केली होती. त्यानंतर नशेच्या अवस्थेत पती-पत्नीमध्ये वाद झाला आणि या वादाचे रूपांतर भीषण खुनात झाले. रागाच्या भरात पत्नीने पतीचा गळा आवळून हत्या केली, अशी प्राथमिक माहिती पोलिस तपासातून समोर आली आहे.
सदर घटनेने पिंपरी-चिंचवड शहरात खळबळ माजली असून, नागरिकांमध्ये या घटनेबद्दल संताप आणि आश्चर्य व्यक्त केले जात आहे. पोलिसांनी आरोपी पत्नीला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे. राजकीय महत्त्वाकांक्षेने पेटलेले वैवाहिक जीवन शेवटी दुर्दैवी वळणावर पोहोचल्याने ही घटना शहरात चर्चेचा विषय ठरली आहे.




