Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा दणका! साताऱ्यातील घटनेनंतर मुख्यमंत्री ॲक्शन मोडमध्ये; PSI बदनेचे तात्काळ निलंबन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा दणका! साताऱ्यातील घटनेनंतर मुख्यमंत्री ॲक्शन मोडमध्ये; PSI बदनेचे तात्काळ निलंबन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा दणका! साताऱ्यातील घटनेनंतर मुख्यमंत्री ॲक्शन मोडमध्ये; PSI बदनेचे तात्काळ निलंबन

सातारा -फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरच्या आत्महत्येच्या प्रकरणाने संपूर्ण जिल्हा हादरवला आहे. डॉ. संपदा मुंडे यांनी आपले जीवन संपवले असून त्यांच्या हातावरच आत्महत्येचे कारण लिहिले होते. सुसाईड नोटमध्ये दोन व्यक्तींवर लैंगिक अत्याचार आणि मानसिक छळाचे गंभीर आरोप असल्याचे नमूद होते. या घटनेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सातारा एसपींना फोन करून तातडीची माहिती घेतली आणि आरोपी PSI गोपाल बदने याला तत्काळ निलंबित करण्याचे आदेश दिले. 

सातारा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी सांगितले की, या प्रकरणात दोन्ही आरोपी PSI गोपाल बदने आणि प्रशांत बनकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. “गोपाल बदने फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत आहे, तर प्रशांत बनकर सामान्य नागरिक आहे. या दोघांनाही तात्काळ अटक करण्यासाठी पोलिस पथक रवाना करण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कठोर कारवाईसाठी स्पष्ट आदेश दिले आहेत,” असे तुषार दोशी यांनी सांगितले

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

Live Cricket