Home » राज्य » प्रशासकीय » राज्यपाल आचार्य देवव्रत यांचा सातारा जिल्हा दौरा: महाबळेश्वर, कास पठार, पाचगणीसह पर्यटनस्थळांना भेट

राज्यपाल आचार्य देवव्रत यांचा सातारा जिल्हा दौरा: महाबळेश्वर, कास पठार, पाचगणीसह पर्यटनस्थळांना भेट

राज्यपाल आचार्य देवव्रत यांचा सातारा जिल्हा दौरा: महाबळेश्वर, कास पठार, पाचगणीसह पर्यटनस्थळांना भेट

महाबळेश्वर : दि,24 – महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत हे दि. 25 व 26 ऑक्टोबर 2025 रोजी सातारा जिल्ह्याच्या दोन दिवसीय दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यादरम्यान ते महाबळेश्वर, कास पठार, पाचगणी येथील प्रमुख पर्यटनस्थळांना भेटी देणार आहेत.

२५ ऑक्टोबर २०२५ (पहिला दिवस)

दौऱ्याची सुरुवात २५ ऑक्टोबर रोजी दुपारी १२.३० वाजता राजभवन, महाबळेश्वर येथे त्यांच्या आगमनाने होईल. दुपारचे पहिले काही तास राखीव ठेवल्यानंतर, दुपारी २.१५ वाजता राज्यपाल महाबळेश्वर येथून साताराकडे प्रयाण करतील. दुपारी ३.४५ वाजता त्यांचे कास पठार, सातारा येथे आगमन होईल व तेथे ४ वाजेपर्यंत राखीव वेळ आहे.

कास पठारावरून ४ वाजता प्रयाण करून ते ४.१५ वाजता मुनावळे, ता. जावळी येथे पोहोचतील. मुनावळे येथे ४.१५ ते ५.४५ या वेळेत ते वॉटर स्पोर्टस ॲक्टिव्हिटीस उपस्थिती लावणार आहेत. सायंकाळी ६ वाजता मुनावळे येथून ते महाबळेश्वरकडे परत जातील आणि सायंकाळी ७.३० वाजता महाबळेश्वर येथे आगमन करून त्यांचा मुक्काम असेल.

२६ ऑक्टोबर २०२५ (दुसरा दिवस)

दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी, २६ ऑक्टोबर रोजी राज्यपाल महाबळेश्वर येथील विविध निसर्गरम्य पॉईंट्सची पाहणी करतील. सकाळी ९.३० ते ११ वाजेपर्यंत ते आर्थर सिट पॉईंटला भेट देतील. त्यानंतर ११.१० ते ११.२० वाजेदरम्यान सावित्री पॉईंट आणि ११.४० ते १२ वाजेपर्यंत इलिफनस्टन पॉईंटची पाहणी करतील.

दुपारी १२ वाजता ते कॉटेज पॉईंटकडे प्रयाण करतील आणि १२.३० ते १२.४० वाजेपर्यंत कॉटेज पॉईंटची पाहणी करतील. दुपारी १ वाजता राज्यपाल राजभवन, महाबळेश्वर येथे परत येतील.

दुपारी २.१५ वाजता राजभवन येथून प्रयाण करून ते २.३० वाजता वेण्णा लेक येथे उपस्थित राहतील आणि २.४० वाजता तेथून निघतील. यानंतर, दुपारी ३ वाजता त्यांचे टेबल लँड, पाचगणी येथे आगमन होईल. तेथे ३ ते ३.४५ वाजेपर्यंत टेबल लँडची पाहणी केल्यानंतर, दुपारी ३.४५ वाजता राज्यपाल आचार्य देवव्रत पुण्याकडे प्रयाण करतील व त्यांचा सातारा जिल्ह्याचा दौरा संपेल.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

कार्यक्षेत्रातील सभासदांनी किसन वीर व खंडाळा कारखान्यास ऊस घालावा नामदार मकरंदआबा पाटील : गळित हंगाम शभारंभ उत्साहात

Post Views: 133 कार्यक्षेत्रातील सभासदांनी किसन वीर व खंडाळा कारखान्यास ऊस घालावा नामदार मकरंदआबा पाटील : गळित हंगाम शभारंभ उत्साहात

Live Cricket