Home » राज्य » सुमधुर गीतांनी उजळली दिवाळी पहाट दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्थेतर्फे आयोजन

सुमधुर गीतांनी उजळली दिवाळी पहाट दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्थेतर्फे आयोजन  

सुमधुर गीतांनी उजळली दिवाळी पहाट दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्थेतर्फे आयोजन  

सातारा दिनांक २० (प्रतिनिधी)दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्थेने आयोजित केलेल्या दिवाळी पहाट कार्यक्रमाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.शाहूपुरी चौकामध्ये आयोजित करण्यात आलेल्या या दिवाळी पहाट कार्यक्रमात आनंद यात्री ग्रुपच्या कलाकारांनी अनेक सुमधुर गाणी सादर करून दिवाळी पहाट खऱ्या अर्थाने उजळून टाकली.

या दिवाळी पहाट कार्यक्रमाला या कार्यक्रमांमध्ये मराठी- हिंदी सुश्राव्य , सुमधुर गीतांमध्ये प्रार्थना, भक्ती गीते ,भावगीते गवळण , लावणी,लोकगीते, प्रेम गीते या सारख्या गीतांचा समावेश करण्यात आला होता..या कार्यक्रमाची सुरुवात गुड्डी चित्रपटातील “हमको मन की शक्ती देना” या प्रिया अघोर व ॲड. रेश्मा वाळिंबे व मधु गिजरे यांच्या गीतेने झाली.यानंतर विजया चव्हाण चल उठ रे मुकुंदा” ही भूपाळी सादर केली. परितोष अघोर शोधीशी मानवा राउळी मंदिरी”रेश्मा वाळिंबे ” ज्योती कलश छलके” प्रशांत कुलकर्णी” विठू माऊली तू माऊली जगाची” ॲड. लक्ष्मीकांत अघोर व प्रिया अघोर ” फिटे अंधाराचे जाळे” मुकुंद पांडे व विजया चव्हाण ” धुंद हा एकांत”अरुण कुलकर्णी ” येशील येशील येशील”प्रिया अघोर ” आली माझ्या घरी ही दिवाळी”

मुकुंद पांडे “सूर तेच छेडीता”मधु गिजरे ” रेशमाच्या रेघानी” या लावणीला वन्स मोर मिळाला..या कार्यक्रमाचा शेवट ॲड.रेश्मा वाळिंबे, प्रिया अघोर,मधु गिजरे, विजया चव्हाण यांनी गायलेल्या“लखलख चंदेरी” या गाण्याने कार्यक्रमाची सांगता झाली या

कार्यक्रमात सचिन शेवडे यांनी“सखी मंद झाल्या तारखा”हे शिरीष चिटणीस यांचे फर्माईश गीत गायिले. दरम्यान मुकुंद पांडे, प्रशांत कुलकर्णी, अरुण कुलकर्णी, ऍड लक्ष्मीकांत अघोर, सौ प्रिया अघोर, ऍड रेश्मा वाळिंबे ‘ मधु गिजरे ‘विजया चव्हाण’ परितोष अघोर यांनी विविध गाणी सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केले .

कार्यक्रमाची उत्कृष्ट ध्वनी व्यवस्था सचिन शेवडे- अक्षता शेवडे यांनी केली होती. कार्यक्रमाचे निवेदन ऍड .स्नेहल कुलकर्णी यांनी केले. गायक कलाकारांनी सादर केलेल्या गाण्यांना सचिन शेवडे यांनी सिंथसायझरवर, विजय कांबळे यांनी ऑक्टोपॅडवर आणि कमलाकर दळवी यांनी तबल्यावर उत्कृष्ट साथ दिली रेशमाच्या रेघांनी या लावणीगीतावेळी दळवी यांनी तबल्यावर वाजवलेला तोडा रसिकांना मंत्रमुग्ध करून गेला.

     या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून काका पाटील, मुकुंद फडके ,शिरीष चिटणीस,श्रीकांत कात्रे ,शिल्पा चिटणीस ,संध्या चौगुले उपस्थित होते . यावेळी सर्व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते कलाकारांचा आणि उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.सतत 19 वर्षे दिवाळी पहाट हा कार्यक्रम सादर करून शिरीष चिटणीस आणि त्यांच्या दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्थेने सातारचे सांस्कृतिक वैभव जपले आहे अशी भावना यावेळी मुकुंद फडके यांनी व्यक्त केली.दीपावली या सणाचे नातेसंबंध जपणारे महत्त्वही त्यांनी अधोरेखित केले .मुकुंद फडके हे अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे. तसेच मुकुंद पांडे यांचा आनंदीयात्री हा ग्रुप

त्यांनी उत्तम प्रकारे तयार केला असून प्रत्येक गायकाला त्याच्या आवाजानुसारच ते गाणे गायला देतात. आजचा हा कार्यक्रम स्तुत्य झाला असे

शिरीष चिटणीस म्हणाले

दिवाळीच्या दिवशी एक सुंदर संगीत सकाळ दीपलक्ष्मी पतसंस्था व शिरीष चिटणीस यांच्या माध्यमातून गिफ्ट म्हणून समस्त सातारकरांना मिळाली अशी भावना संध्या चौगुले यांनी व्यक्त केली .

दीपलक्ष्मी घेत असलेल्या दिवाळी पहाट कार्यक्रमांमध्ये सातत्य असल्यामुळे गेली 19 वर्ष हा कार्यक्रम अविरत चालू आहे . कराओके या सारख्या कार्यक्रमांना सुरुवातीच्या काळापासून आज अखेर पर्यंत हक्काचे व्यासपीठ दिले जात आहे. त्यांची टीम सुद्धा चांगले काम करीत आहे .असे काका पाटील म्हणाले.संस्था करत असलेल्या विविध उपक्रमाचे कौतुक त्यांनी केले .

यावेळी दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्थेचे व्यवस्थापक विनायक भोसले शाहूपुरी शाखेचे शाखाधिकारी रवींद्र कळसकर संचालक आप्पासो शालगर लालासो बागवान , प्रदीप देशपांडे, अनिल चिटणीस ,जगदीश खंडागळे मान्यवर उपस्थित होते…

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

सातारा जिल्ह्यातील वाई नगरपरिषदेचा गड जिंकला; दिलेले प्रत्येक वचन पूर्ण करणार – मंत्री जयकुमार गोरे

Post Views: 334 सातारा जिल्ह्यातील वाई नगरपरिषदेचा गड जिंकला; दिलेले प्रत्येक वचन पूर्ण करणार – मंत्री जयकुमार गोरे सातारा :

Live Cricket