Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » स्वरा ठरली देवदूत — वडिलांना दिलं आयुष्याचं दुसरं पान

स्वरा ठरली देवदूत — वडिलांना दिलं आयुष्याचं दुसरं पान

दमलेल्या बाबासाठी लेक ठरली जीवनदायीनी. लेकीच्या अवयव दानामुळे वडिलांना मिळाले नवे जीवन

गोठलेल्या अश्रूंना तिथे वाट नव्हती, तर तिथे होती फक्त नी फक्त आस….जगण्याची आणि जगवण्याची.

सातारा -अ अ म्हणता आई बोलणारी, ब ब म्हणता बाबा बोलणारी ‘स्वरा’ आपल्या बालपणीचा आनंद लुटत शिक्षणाची पायाभरणी करत होती, एक एक टप्पा सर करत ती पुढे सरसावली होती, तिला पंख होते ते उडण्यासाठी, भरारी घेण्यासाठी, स्वप्नांच्या दुनियेत हरवाताना कल्पनांना कवेत घेत वास्तवाच्या गुजगोष्टी तिला जिंकून देत होत्या, आईवडिलांचे सुसंस्कार पाठिशी असल्यावर कोणतंच ध्येय अवघड नसत आणि का नसाव या गोष्टीतून पुढे जाताना महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करताना का कोणास ठाऊक आयुष्याच्या स्वप्नात गर्त हरवलेल्या दचकून जाग यावी अन् अर्धवट स्वप्नांची मालिका क्षणभंगुर खंडित व्हावी असंच काहीसं झालं स्वरा बरोबर तिच्या संपूर्ण कुटुंबाला.

शांत, संयमी आणि नम्रतेची कास धरून वाटचाल करणारे वडील ऋषीकेश तावरे शारिरीक दृष्ट्या कमकुवत झाल्याची मेडिकल रिपोर्टमधून बातमी कळाली, मनाला आघात व्हावा अन् तो सहन न व्हावा इतकं भल मोठं डोंगराएवढी दुःख आपल्याच पदरी का पडाव म्हणून त्यात अडकवून घेण्यापेक्षा त्यातून मार्ग काढण्याची सहनशीलता होती ती वडिलांना सावली सारखी साथ देणारी आई माधुरीच्या अंगी.

वडिलांना लिव्हर प्राॅब्लेम असल्याने त्यावर उपचार म्हणजेच प्रत्यारोपण (लिव्हर बदली) करणे ह्या शिवाय पर्याय नाही.

दमलेल्या बाबाची कहाणी सारखी गाणी कधीही ऐकली तरी डोळ्यांत पाणी आणतात. जन्मदाता’चं पद भूषवण्याहुन अधिक, स्वत:च्या मुलांना सर्वोत्तम सुफल जीवन लाभावं म्हणुन आपलं संपुर्ण आयुष्य मुलांसाठी वेचणारा बाप, प्रत्येक संकटाला धाडसाने तोंड द्यायला शिकवणारा बाप, मुलांची दु:खं आणि वेदना पाहुन रडु शकत नाही म्हणुन आतल्या आत घुसमटणारा बाप, मुलीच्या सासरचं आणि मुलाच्या वागणुकीचं दडपण घेऊन जगणारा बाप असे अनेक मुखवटे लावुन ’वडील’ हे पात्र आयुष्याच्या रंगपटावर उत्तोमोत्तम अभिनय करण्याचा प्रयत्न करत असतं पण आज त्याच्यावर वेळ येते तेव्हा गरज असते जाणिवेची.

म्हणूनच मुलगी स्वरा हिच लिव्हर त्यांना मॅच होत असल्याने तिने क्षणाचाही विलंब न लावता मेडिकल प्रोसेस पूर्ण करून आपल्या जन्मदात्या वडिलांना नवा दिवस दाखवण्यासाठी स्वताचं लिव्हर देऊ केले.

आज वडील आणि स्वरा दोघांचीही तब्येत चांगली आहे, एवढ्या लहान वयात आपल्या वडिलांसाठी जीवनदायीनी ठरलेल्या स्वराचा केएम हाॅस्पिटलच्या डाॅक्टरांनी तिचा आणि वडिलांना सत्कार केला.

या भावनिक क्षणी कुणाचे डोळे पाणावल्या शिवाय राहणार नाही कारण बोलणं सोपं असतं पण वेळ येते तेव्हा आर्थिक, मानसिक आणि शारीरिक गोष्टी जोड उभी करणे हे मोठे आव्हान असते या सगळ्या प्रसंगी आई हा रोल खुप महत्वाचा असतो आणि त्यामुळेच ही आधाराची गरज एक जीवन परिपूर्ण करण्याचे बळ देते.

स्वरा सारखी लेक होती म्हणूनच आज त्यांना सुंदर जग पाहता आलं पण एक मात्र नक्की आयुष्यात निर्भिडपणे जगण्याची ताकद स्वराला मिळाली ती नेहमीच शारीरिक मानसिक आणि बौद्धिक दृष्ट्या एक पाऊल पुढेच टाकेल.

दिपक पवार, चिंधवली.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

यशोदा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्समध्ये जागतिक ध्यान दिन उत्साहात साजरा

Post Views: 293 यशोदा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्समध्ये जागतिक ध्यान दिन उत्साहात साजरा मानसिक आरोग्य व आत्मशांतीचा संदेश देणारा प्रेरणादायी उपक्रम

Live Cricket