दीपलक्ष्मी पतसंस्था आयोजित दिवाळी पहाट निमित्त ” आनंदयात्री ” प्रस्तुत गीत मैफिल कार्यक्रम सोमवारी
सातारा : 18 (प्रतिनिधी) दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था मर्या,. सातारा या संस्थेच्या वतीने प्रतिवर्षी प्रमाणे यावर्षीही शाहूनगर वासियांना व समस्त सातारकर रसिक श्रोत्यांसाठी दिवाळी सणाच्या मंगल प्रसंगाचे औचित्य साधून संस्थेच्या वतीने शाहूपुरी शाखेच्या प्रांगणात ” शाहूपुरी चौक” सातारा येथे दिवाळी पहाट निमित्त आनंदयात्री प्रस्तुत” या ग्रुप सोबत साजरी करूया संगीतमय दिवाळी पहाट हिंदी व मराठी गीतांचा श्रवणीय कार्यक्रम सोमवार दि. 20 ऑक्टोबर 2025 रोजी नरक चतुर्दशी दिवशीपहाटे 6 ते 8 वाजेपर्यंत आयोजित करण्यात आला आहे.
” नभोमंडपी नवकिरणांची
झगमगते नव्हाळी बांधून पैंजण सुरावटींचे हासत आली दिवाळी सुर गुंफण्या संवादासह आनंदयात्री आले आप्तजनांच्या भेटीचेक्षण अमृतमय झाले
नव्या सुरांची मैफिल सजता
मन गाभारा उजळून जातो आशीर्वादे श्री लक्ष्मीच्या
उत्कर्षाचा दीप तेवतो …
या शिल्पा चिटणीस यांच्या सुंदर
चारोळी ने संस्थेचे संस्थापक-चेअरमन शिरीष चिटणीस यांनी दीपावली निमित्त संस्थेच्या सर्व सभासद,खातेदार व हितचिंतकांना मंगलमय शुभेच्छा दिल्या.
” आनंदयात्री ” या सदाबहार हिंदी आणि मराठी गीतांचा श्रवणीय ,सुमधुर “दिवाळी पहाट” कार्यक्रमात मुकुंद पांडे,
प्रशांत कुलकर्णी , अरुण कुलकर्णी,ॲड.लक्ष्मीकांत अघोर , प्रिया अघोर ,ॲड. रेश्मा वाळिंबे, मधु गिझरे , विजया चव्हाण, परितोष अघोर गायक कलाकार आपली सुमधुर गीते रसिक श्रोत्यांसाठी सादर करणार असून या कार्यक्रमाचे निवेदन
ॲड. स्नेहल कुलकर्णी करणार असून ध्वनी व्यवस्था सचिन शेवडे व अक्षता शेवडे यांची लाभली आहे. या कार्यक्रमात सचिन शेवडे साथ संगत, तसेच संगीत संयोजक सिंथसायझर वर साथ देणार आहेत…
तबला व ढोलकी ची साथ शांताराम दयाळ, ऑक्टोपॅड विजय कांबळे तसेच ताल वाद्याला आशुतोष वाळिंबे यांची यांची साथ लाभली आहे.
हिंदू संस्कृतीमध्ये अनन्य साधारण महत्व असलेल्या सर्व सणापैकी सणांचा शिरोमणी असलेला दिवाळीचा सण सुरू झाला असून या दिवाळी सणाचा समस्त सातारकर रसिक श्रोत्यांचा आनंद द्विगुणित करण्याकरिता दीपलक्ष्मी पतसंस्थेने सन 2007 पासूनच शाहूपुरीवासीयांसाठी व समस्त सातारकर रसिक श्रोत्यांसाठी गेली 19 वर्ष अविरत सुमधुर गीतांची सदाबहार पर्वणी देण्याचा उपक्रम सातत्याने राबवित आहे.
या कार्यक्रमास संस्थेचे संस्थापक -चेअरमन, शिरीष चिटणीस, व्हॉ.चेअरमन आप्पासा शालगर ,व्यवस्थापक विनायक भोसले, शाखाधिकारी रवींद्र कळसकर, तसेच संस्थेचे संचालक भगवान नारकर, लालासो बागवान, अनिल चिटणीस, प्रदीप देशपांडे, शिवाजी हंबीरे,जगदीश खंडागळे,शिल्पा चिटणीस, सुनील बल्लाळ, हणमंत खुडे उपस्थित राहणार आहेत.
तरी दीपलक्ष्मी पतसंस्था आयोजित “आनंदयात्री” या गीत मैफिलीस समस्त सातारकर रसिक श्रोत्यांनी उपस्थित रहावे व आपला दिवाळीचा आनंद द्विगुणीत करावा असे आवाहन संस्थेचे व्यवस्थापक विनायक भोसले तसेच आनंदयात्री ग्रुपचे प्रमुख मुकुंद पांडे यांनी केले आहे.




