Home » राज्य » रहिमतपूर नगरपालिकेस 7.58 कोटी रुपयांचा निधी मंजूर-आमदार मनोजदादा घोरपडे यांची माहिती

रहिमतपूर नगरपालिकेस 7.58 कोटी रुपयांचा निधी मंजूर-आमदार मनोजदादा घोरपडे यांची माहिती

रहिमतपूर नगरपालिकेस 7.58 कोटी रुपयांचा निधी मंजूर-आमदार मनोजदादा घोरपडे यांची माहिती

कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील एकमेव असणारी रहिमतपूर नगरपालिकेत 7.58 कोटी रुपयाचा निधी मंजूर झाल्याची माहिती कराड उत्तरचे आमदार मनोजदादा घोरपडे यांनी दिली.

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्याकडे वारंवार केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून रहिमतपूर नगरपालिकेस फार मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध झालेला आहे.

 नगरपालिका वैशिष्टपूर्ण निधी मधून काशीद गल्ली येथे दत्त मंदिर सभागृह बांधणे 1. 20 कोटी, भैरोबा मंदिर येथे भक्त निवास बांधणे 70 लक्ष,रामोशी गल्लीमध्ये सभामंडप बांधणे 50 लक्ष, कोल्हट वस्ती सभागृह बांधणे 30 लक्ष, लिंगायत समाज दफनभूमी दुरुस्त करणे 30 लक्ष,रामकृष्ण गल्ली मारुती मंदिर सभा मंडप बांधणे 25 लक्ष, मातंग वस्ती खंडोबा मंदिर सभागृह बांधणे 20 लक्ष, महालक्ष्मी मंदिर सभागृह बांधणे 25 लक्ष, नांगरे गल्ली महालक्ष्मी मंदिर सभागृह बांधणे 20 लक्ष, बेघर वस्ती सभागृह बांधणे 25 लक्ष, नंदीवाले समाज सभागृह बांधणे 20 लक्ष,टेक नाका येथे हनुमान मंदिर सभागृह बांधणे 30 लक्ष, चंद्रगिरी देवस्थान सभा मंडप बांधणे 25 लक्ष,जत गल्ली भैरोबा गल्ली व्यायामशाळा साहित्य 10 लक्ष, 

जिल्हा नियोजन नागरोत्तन निधी मधून चौंडेश्वरी मंदिर सभागृह बांधणे 1.21 कोटी, काशी विश्वेश्वर मंदिर सभागृह बांधणे 61.34 लक्ष, नगरपालिका दलितत्तोर मधून वडूज रस्ता उत्तम लॉंग रे घर ते चंद्रकांत साळुंखे यांच्या घरापर्यंत काँक्रीट करणे 20 लक्ष, नहरवाडी निकम वस्ती काँक्रीट करणे 11.75 लक्ष, शिवराज भोसले ते दीपक कदम यांच्या घरापर्यंत रस्ता काँग्रेस करणे 8.48 लक्ष, राम तरडे बोळ कॉंक्रीट करणे 4.61 लक्ष, काशीद गल्ली शेडगे व निकम वेळात काँक्रीट करणे 8.11 लक्ष,जिल्हा नियोजन मधून नहरवाडी येथे वाढीव वस्ती वरती विद्युत पोल बसवने 7.40 लक्ष, रहिमतपूर येथे वाडी वस्ती वरती विद्युत पोल बसवणे 16.20 लक्ष इत्यादी कामामुळे रहिमतपूर नगरपालिकेमध्ये नागरिकांना सुख सुविधा उपलब्ध होणार आहेत.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

यशोदा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्समध्ये जागतिक ध्यान दिन उत्साहात साजरा

Post Views: 330 यशोदा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्समध्ये जागतिक ध्यान दिन उत्साहात साजरा मानसिक आरोग्य व आत्मशांतीचा संदेश देणारा प्रेरणादायी उपक्रम

Live Cricket