मंडणगड येथे भारताचे मा. सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते विविध पुस्तकांचे प्रकाशन अनुवादकाने लेखकाची शैली आत्मसात करावी ज्येष्ठ लेखिका अनुवादक डॉक्टर उमा कुलकर्णी यांचे मत  संविधान संघर्ष मोर्चाला साताऱ्यात विविध संघटनांचा प्रतिसाद पुणे विभाग शिक्षक मतदार संघ निवडणूक महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद ताकदीने लढवणार : श्री वेणुनाथ कडू साताऱ्यात गोडवा आणि कुरकुरीचा संगम — व्यापारी सहकारी पतसंस्थेचा ‘ना नफा ना तोटा’ लाडू-चिवडा महोत्सव सुरू! महाराष्ट्राच्या राजकारणाला नवी दिशा: शिंदे गटाने महाबळेश्वरात तरुण नेतृत्वावर टाकला विश्वास; बिरवाडीचे सरपंच समीर चव्हाण यांची उपजिल्हा संघटकपदी नियुक्ती
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » उद्योगजगत » साताऱ्यात गोडवा आणि कुरकुरीचा संगम — व्यापारी सहकारी पतसंस्थेचा ‘ना नफा ना तोटा’ लाडू-चिवडा महोत्सव सुरू!

साताऱ्यात गोडवा आणि कुरकुरीचा संगम — व्यापारी सहकारी पतसंस्थेचा ‘ना नफा ना तोटा’ लाडू-चिवडा महोत्सव सुरू!

साताऱ्यात गोडवा आणि कुरकुरीचा संगम — व्यापारी सहकारी पतसंस्थेचा ‘ना नफा ना तोटा’ लाडू-चिवडा महोत्सव सुरू!

साता-यात लाडू चिवडा महोत्सव सुरु व्यापारी सहकारी पतसंस्थेचा “ना नफा ना तोटा”तत्वावर उपक्रम

सातारा -व्यापारी सहकारी पतसंस्था मर्या. सातारा स्थापना “गुढी पाडवा” १७ मार्च १९९१ पासून संस्थेच्या सभासदांच्या अर्थविषयक गरजा भागवीत असतानाच विविध समाजिक उपक्रमांना अर्थसहाय्य करीत असते. तसेच स्वतः सुद्धा समाजहिताचे उपक्रम राबवीत असते, कडाडलेल्या महागाईत नागरिकांना माफक दरातील दिवाळी फराळातील लाडू, चिवडा मिळावा यासाठी येथील चिवडा “व्यापारी सहकारी पतसंस्थेच्या वतीने सलग २१ व्या वर्षी “व्यापारी लाडू महोत्सव” आयोजित केला आहे. सदर उपक्रम हा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कै. गुरुप्रसाद सारडा यांच्या संकल्पनेतून २१ व्या वर्षीही सातारा लाडू चिवडा महोत्सव चालू ठेवण्यात आला आहे.

सदर महोत्सवाचे उदघाटन संस्थेचे चेअरमन श्री. दिलीप पिलके यांचे हस्ते करणेत येत आहे.पतसंस्थेच्या वतीने गेली २० वर्षे हा महोत्सव आयोजित केला जातो, त्यास नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळतो. लाडू व चिवडा तयार करण्यासाठी बेसन, तेल, साखर, शेंगदाणे, पोहे, चुरमुरे दर्जेदार वापरले जातात, याबाबत कोणतीही तडजोड केली जात नाही. हा लाडू चिवडा महोत्सव “ना नफा ना तोटा” या तत्वावर नागरिकांना देण्यात येणार आहे असे श्री. पिलके यांनी सांगितले. या वर्षी मजुरी, इंधन, लागणारा कच्चा माल यामध्ये अधिक वाढ झाली आहे, असे असतानासुद्धा चिवडा केवळ रु. १९०/- व लाडू रु. १९०/- प्रती किलो या दराने उपलब्ध करून देण्यात येत आहे.

यंदाचा लाडू चिवडा महोत्सव बुधवार दिनांक १५/१०/२०२५ ते २३/१०/२०२५ या नऊ दिवसाचे कालावधी मध्ये सुरु ठेवण्यात येणार आहे. श्री. प्रभाकर राऊत मिठाईवाले, मल्हार पेठ, सातारा येथे आयोजित केला असून, लाडू, चिवडा विक्रीची संपूर्ण व्यवस्था “श्री. भरतशेठ राऊत, राऊत मिठाईवाले” यांचेकडेच करणेत आली आहे. तरी या उपक्रमास सातारकरांनी ज्यास्तीत ज्यास्त प्रतिसाद देऊन या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन चेअरमन श्री. दिलीप पिलके यांनी केले आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

मंडणगड येथे भारताचे मा. सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते विविध पुस्तकांचे प्रकाशन

Post Views: 21 मंडणगड येथे भारताचे मा. सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते विविध पुस्तकांचे प्रकाशन मंडणगड (रत्नागिरी) : भारताचे मा.

Live Cricket