आपली फलटण मॅरेथॉन २०२५ला उत्स्फूर्त प्रतिसाद — आरोग्यदायी जीवनाचा संदेश
फलटण : जोशी हॉस्पिटल प्रा. लि. फलटण व रोबोटिक सेंटर तसेच डॉ. प्रसाद जोशी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “आपली फलटण मॅरेथॉन २०२५” या स्पर्धेचा शुभारंभ सजाई गार्डन, फलटण येथे झाला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी मॅरेथॉनचा शुभारंभ करून सर्व स्पर्धकांना यशासाठी शुभेच्छा दिल्या.
२१, १०, ५ आणि ३ किलोमीटर अशा चार टप्यांमध्ये ही स्पर्धा पार पडली. सकाळच्या ताज्या वातावरणात झालेल्या या मॅरेथॉनला फलटणकरांनी मोठा प्रतिसाद दिला. विविध वयोगटांतील धावपटूंनी उत्साहाने सहभाग घेत आरोग्यदायी जीवनाचा संदेश दिला.
या मॅरेथॉनच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. प्रसाद जोशी, डॉ. शरद धायगुडे, डॉ. सुनीता निंबाळकर, डॉ. वल्लभ कुलकर्णी, डॉ. योगेश बागल, अझरुद्दीन मुजावर, सुरेश कुलकर्णी (जोशी हॉस्पिटल प्रा. लि. फलटण) आणि संपूर्ण सहकाऱ्यांचे विशेष अभिनंदन करण्यात आले.
या उपक्रमातून फलटण शहरात आरोग्य, एकता आणि सामाजिक जाणीव यांचा सुंदर संगम पाहायला मिळाला.
