“माझा पैसा माझा अधिकार”महामेळावा महासैनिक भवन येथे आयोजीत होणार
जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते होणार मेळाव्याचे उद्घाटन
वित्तीय सेवा विभाग वित्त मंत्रालय केंद्र सरकार यांच्या उपक्रमानुसार जिल्हा अग्रणी बँक सातारा यांनी कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे.
सातारा -सातारा जिल्ह्याची अग्रणी बँक असणारी बँक ऑफ महाराष्ट्र जिल्ह्यातील विविध बँकांच्या माध्यमातून बँकेमध्ये दावा न केलेल्या 101 ठेवी 3,18,000 खातेदारांना परत मिळवण्याकरता महासैनिक भवन सातारा येथे दिनांक 15 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 11.00 वाजता महामेळावा आयोजित केला आहे या मेळाव्यास जिल्हाधिकारी श्री संतोष पाटील सर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत राज्यस्तरीय बँकर समितीचे महाप्रबंधक श्री मनोज करे, बँक ऑफ महाराष्ट्राचे अंचल प्रबंधक सौरभ सिंग तसेच वित्त विभाग भारत सरकार यांचे प्रतिनिधी भारतीय रिझर्व बँकेचे अधिकारी सर्व बँकांचे अधिकारी या मेळाव्यामध्ये उपस्थित राहणार आहेत.
या महा मेळाव्यामध्ये ज्या लोकांचे ठेवी बँकेमध्ये दावा न करता पडून आहेत अशा सर्व लोकांनी सहभागी होऊन या ठिकाणी उपस्थित राहावे.भारत सरकार व रिझर्व बँक ऑफ इंडिया यांच्या माध्यमातून संपूर्ण देशभरामध्ये दिनांक 1 ऑक्टोबर ते 31 डिसेंबर 2025 या कालावधीमध्ये मागील दहा वर्षांमध्ये ज्या खात्यामध्ये व्यवहार झालेले नाहीत अशा बंद झालेल्या खात्यातील सर्व ठेवी भारतीय बँकेच्या नियमानुसार ठेवीदार शिक्षण व जागरूकता निधीमध्ये (DEAF) हस्तांतरित केल्या जातात बरेच लोक अज्ञानामुळे अथवा मयत असल्याने बँकेत असलेल्या ठेवीकडे परत मिळण्यासाठी पाठपुरावा करत नाहीत पर्यायाने यांचे पैसे भारतीय रिझर्व बँकेकडे डी इ ए एफ फंडामध्ये जमा होत असतात .
या मेळाव्यामध्ये ज्या लोकांनी दावा केलेला नाही अशा सर्व ठेवी योग्य ते कागदपत्र बँकेमध्ये सादर करून ठेवीची रक्कम खातेदाराला अथवा त्यांच्या वारसांना मिळू शकते याकरता ही मोहीम राबवली जाणार आहे. तरी आज पावेतो दावा न दाखल केलेल्या व्यक्तींनी आपले बँकखाते पुस्तक ,आधार कार्ड ,पॅन कार्ड इत्यादी कागदपत्रासहित महासैनिक भवन, करंजे नाका, सातारा येथे उपस्थित राहून या योजनेचा फायदा घ्यावा असे आवाहन जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक नितीन तळपे यांनी केले.
