Home » राज्य » प्रशासकीय » महाबळेश्वर नगराध्यक्षपदासाठी चुरशीची लढत — किसनशेठ शिंदे ठरणार किंगमेकर

महाबळेश्वर नगराध्यक्षपदासाठी चुरशीची लढत — किसनशेठ शिंदे ठरणार किंगमेकर

महाबळेश्वर नगराध्यक्षपदासाठी चुरशीची लढत — किसनशेठ शिंदे ठरणार किंगमेकर

महाबळेश्वर (अली मुजावर) : महाराष्ट्राचं नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाबळेश्वर नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदाचं आरक्षण सर्वसाधारण प्रवर्गासाठी जाहीर झालं आहे. त्यामुळे या पदासाठी यंदा चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे.

गेल्या तीन वर्षांहून अधिक काळ महाबळेश्वर नगरपालिका प्रशासकांच्या अखत्यारीत होती. मात्र, आता नगरपालिकेच्या निवडणुकीचा बिगुल वाजण्यास काहीच दिवस उरले आहेत. नगराध्यक्ष पदाच्या आरक्षणाची सोडत जाहीर होताच महाबळेश्वर शहरातील राजकीय वातावरण तापू लागले आहे.

मंत्री मकरंदआबा पाटील यांच्या नेतृत्वात महाबळेश्वर नगरपालिकेच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व कायम राहिले आहे. विशेष म्हणजे, मंत्री मकरंदआबा पाटील यांचे अत्यंत विश्वासू नेते किसनशेठ शिंदे हे यावेळी राष्ट्रवादीची मोठ बांधून ‘किंग मेकर’च्या भूमिकेत असतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

महाबळेश्वरच्या राजकारणात जाणकार, मुत्सद्दी आणि संतुलन राखणारे नेते म्हणून किसनशेठ शिंदे यांची ओळख आहे. बेरजेच्या राजकारणात त्यांचा हातखंडा असून, येणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीत त्यांची भूमिका निर्णायक ठरणार, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

आगामी काही दिवसांत राजकीय समीकरणे कशी बदलतात आणि कोणाच्या बाजूने जनता कौल देते, याकडे आता महाबळेश्वरवासीयांचे लक्ष लागले आहे.

 

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

एआय, ब्लॉकचेन आणि डिजिटायझेशनमुळे पारदर्शकता आणि कार्यक्षमतेत वाढ’-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Post Views: 9 ‘एआय, ब्लॉकचेन आणि डिजिटायझेशनमुळे पारदर्शकता आणि कार्यक्षमतेत वाढ’-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज मुंबई

Live Cricket