Home » राज्य » पर्यटन » ओझर्डे ग्रामपंचायतीने ग्रामस्थांनचे आठवडा बाजार सुरू करुन इच्छा पुर्तीचे उद्दीष्ट केले पुर्ण

ओझर्डे ग्रामपंचायतीने ग्रामस्थांनचे आठवडा बाजार सुरू करुन इच्छा पुर्तीचे उद्दीष्ट केले पुर्ण

ओझर्डे ग्रामपंचायतीने ग्रामस्थांनचे आठवडा बाजार सुरू करुन इच्छा पुर्तीचे उद्दीष्ट केले पुर्ण 

वाई प्रतिनिधी (शुभम कोदे)वाई तालुक्यात राजकीय दृष्ट्या जागृत असलेल्या ओझर्डे ग्रामपंचायती मार्फत येथील तरकारी उत्पादक शेतकरी व इतर जिवनावश्यक वस्तु विकणारे व्यापारी व विविध वस्तूंचे उत्पादन करणारे बचत गट यांना आपल्या मालाची विक्री करण्या साठी गावात आठवडा बाजार भरविण्यात यावा त्यामुळे हक्काची बाजारपेठ उपलब्ध होईल अशी मागणी येथील ग्रामस्थांनसह  तरकारी उत्पादक शेतकरी व छोटे व्यावसायीक उद्योजक या  सर्वांनी अनेक वर्षां पासून ग्रामपंचायती कडे गावात आठवडा बाजार सुरू करण्याचा तगादा लावला होता .

शेतकऱ्यांच्या या मागणीची गंभीर दखल घेवून ग्रामपंचायतीचे उपसरपंच शेखर फरांदे डॉ . विकास पिसाळ डॉ.सत्यजीत नेमाडे केशव पिसाळ अतुल कदम चंद्रकांत रिठे सौ.निता फाटक सौ शुभांगी पिसाळ सौ .सुरेखा क्षिरसागर सौ . सुनंदा शिंदे श्रीमती रेखा कदम श्रीमती अनिता जायगुडे सुनीता पवार कु . हर्षदा फरांदे या सर्वांनी एकत्रीत येवुन तातडीची बैठक बोलावून आठवडा बाजार भरविण्या संदर्भात व त्याचे नियोजन करण्यासाठी सखोल चर्चा झाली.व त्याच्या मंजुरी साठी वाई कृषी उत्पन्न बाजार समितीची परवानगी घेणे बंधनकारक असते .

तसेच स्थानिक शेतकऱ्यांनसह तालुक्यातुन येणारे शेतकरी व्यापारी यांच्या शेत मालाची सुरक्षितता व आठवडा बाजारा दिवसी कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही याची जबाबदारी आणी ग्रामपंचायतीला मोठ्या उत्पन्नाचे साधन तयार होईल 

अशा विविध विषयांवर चर्चा होवुन या बैठकीत एकमताने आठवडा बाजार भरविण्याचा निर्णय घेण्यात आला व तसा ठराव देखील एक मुखाने करण्यात आला .या ठरावाची प्रत आणी आठवडा बाजार भरविण्या साठीच्या आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करुन तसा प्रस्ताव तयार करून तो वाई कृषी उत्पन्न बाजार समितीकडे ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी संजय वर्णेकर यांनी दि .१३ / ८ /२५ रोजी दाखल केला . तब्बल एक महिना वर्णेकर आणी उप सरपंच या दोघांनी बाजार समिती कडे सतत पाठपुरावा करुन 

अखेर दि .१५ / ९ / २५ रोजी वाई कृषी उत्पन्न बाजार समितीने आठवडा बाजार भरविण्याचे मंजुरीचे अधिकृत पत्र ओझर्डे ग्रामपंचायतीला दिल्याने ग्रामपंचायतीने विकासात्मक दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेऊन एक मोठे पाऊल पुढे टाकल्याचा आनंद सर्वांना झाला .

आठवडा बाजार हा महिन्यातील प्रत्येक रविवारी भरविण्यात येणार आहे त्या प्रमाणे दि .७ रोजीच्या रविवारी ग्रामपंचायतीचे सर्व पदाधिकारी मान्यवर ग्रामस्थ गावातील अंदाजे ८० महिला बचत गटांच्या महिलांच्या हस्ते श्रीफळ वाढवून मोठ्या उत्साहात या आठवडा बाजाराची सुरुवात करण्यात आली .या आठवडा बाजारात स्थानिक शेतकऱ्यांनसह वाई तालुक्यातील असंख्य शेतकर्यांनी आपला माल विक्रीसाठी आणुन या बाजाराची शोभा वाढवली याचीही ओझर्डे ग्रामपंचायतीने दखल घेऊन बाजारात आलेल्या प्रत्येक विक्रेत्यांचे श्रीफळ देऊन यथोचित सन्मान केला.

या बाजारात खरेदीसाठी कधीच घराच्या बाहेर न पडणाऱ्या महिला देखील भाजी पाला तरकारी व इतर जिवनाआवश्यक वस्तुंची खरेदी करताना दिसत होत्या.गावात आठवडा बाजार सुरू झाल्याच्या आनंदांची चर्चा गावभर सुरू होती .

त्याच बरोबर आलेल्या विक्रेत्यांचा विक्री साठी आणलेल्या मालाची सर्व विक्री झाल्याचा आनंद विक्रेत्यांच्या चेहर्यावर दिसत होता .या वेळी विकासाचे एक पाऊल पुढे टाकलेचा आनंद ग्रामपंचायतीच्या पदाधिकारी आणी सर्व सदस्यांनच्या चेहर्यावर दिसत होता हा आनंद पेढे वाटून व्यक्त करण्यात आला .

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

महाबळेश्वर नगराध्यक्षपदासाठी चुरशीची लढत — किसनशेठ शिंदे ठरणार किंगमेकर

Post Views: 392 महाबळेश्वर नगराध्यक्षपदासाठी चुरशीची लढत — किसनशेठ शिंदे ठरणार किंगमेकर महाबळेश्वर (अली मुजावर) : महाराष्ट्राचं नंदनवन म्हणून ओळखल्या

Live Cricket