Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » उद्योगजगत » पाचगणी नगरपालिकेत शिवसेना स्वतंत्र पॅनल लढविणार-युवा नेतृत्व राहुल शिंदे

पाचगणी नगरपालिकेत शिवसेना स्वतंत्र पॅनल लढविणार-युवा नेतृत्व राहुल शिंदे

पाचगणी नगरपालिकेत शिवसेना स्वतंत्र पॅनल लढविणार-युवा नेतृत्व राहुलजी शिंदे

पाचगणी (प्रवीण घाडगे )-पाचगणी नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीचे बिगुल वाजल्यानंतर शहरातील राजकीय वातावरण तापले असून, यंदाची निवडणूक चुरशीची होणार यात शंका नाही. वाढती लोकसंख्या आणि मतदारसंख्या लक्षात घेता यावर्षी नगरसेवकांची संख्या १७ वरून २०, तर प्रभागांची संख्या १० इतकी वाढविण्यात आली आहे.

शिवसेना (शिंदे गट) या निवडणुकीत स्वतंत्र पॅनल उभे करून पूर्ण ताकदीने उतरायला सज्ज झाली आहे. “विकास आणि जनतेचा विश्वास” या दोन भक्कम आधारस्तंभांवर पक्षाने आपला निवडणूक प्रचार उभारण्याचे ठरवले आहे. पाचगणी शहरात अनेक आधुनिक विकासकामे व राज्य शासनाच्या विविध योजना आणण्यासाठी पक्ष प्रयत्नशील असल्याचे राहुल शिंदे यांनी स्पष्ट केले आहे.

याच पार्श्वभूमीवर राहुल शिंदे यांच्या नेतृत्वाबाबत शहरात विशेष उत्सुकता निर्माण झाली आहे. त्यांच्या कार्यतत्परतेमुळे, जनसंपर्कामुळे आणि तरुणाईतील लोकप्रियतेमुळे ते आगामी निवडणुकीत शिवसेनेचेनिर्णायक चेहरा ठरू शकतात, अशी चर्चा नागरिकांमध्ये रंगू लागली आहे.

उपमुख्यमंत्री श्री.एकनाथ शिंदे आणि पालकमंत्री श्री. शंभूराज देसाई यांच्या नेतृत्वाखाली  शिवसेना पाचगणीत पुन्हा एकदा जनतेच्या विश्वासाचे बळ घेऊन मैदानात उतरणार आहे. त्यामुळे यंदाची पाचगणी नगरपरिषद निवडणूक रोचक आणि ऐतिहासिक ठरण्याची चिन्हे स्पष्टपणे दिसत आहेत. युवा नेते राहुल शिंदे यांच्या नेतृत्वात पाचगणी नगरपालिकेच्या राजकारणात  निश्चितच राजकीय बदल पहावयास मिळणार आहे.

 

 

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

माझा पैसा माझा अधिकार”महामेळावा महासैनिक भवन येथे आयोजीत होणार

Post Views: 4 “माझा पैसा माझा अधिकार”महामेळावा महासैनिक भवन येथे आयोजीत होणार जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते होणार मेळाव्याचे उद्घाटन वित्तीय सेवा विभाग

Live Cricket