महाबळेश्वर वाहतूक कोंडीसाठी मोठा दिलासा! वेण्णालेक बायपास रस्ता व कमाणी पुलाच्या कामाला लवकरच प्रारंभ
महाबळेश्वर दि ७ प्रतिनिधी : हंगामात होणारी वाहतुक कोंडी सोडविण्यासाठी वेण्णालेक बायपास मार्गा वरील रस्ता व कमाणीपुलाच्या उभारणीतील सर्व अडथळे मदत व पुर्नवसन मंत्री मकरंद पाटील यांच्या प्रयत्नाने दुर झाले असुन लवकरच या पर्यायी कमानीपुल व रस्त्याच्या कामाला प्रारंभ केला जाणार असल्याची माहीती राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर पदाधिकारी यांनी दिली आहे.
महाराष्ट्राचे नंदनवन म्हणुन प्रसिध्द असलेले महाबळेश्वर हे विविध हंगामात पर्यटकांच्या गर्दीने फुलून जाते. या गर्दी मुळे महाबळेश्वर शहर व परीसरातील सर्व रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर वाहतुक कोंडी होते. विशेषतः महाबळेश्वर पांचगणी दरम्यान सर्वात अधिक वाहतुक कोंडी होते हे वीस कि.मी अंतर पार करण्यासाठी कधी कधी वाहन धारकांना दोन ते तीन तास लागतात मॅप्रो गार्डन व वेण्णालेक येथे पर्यटक थांबत असतात त्या मुळे या दोन ठिकाणी वाहतुक कोंडी होते. ही कोंडी सोडविण्यासाठी वेण्णालेक पासुन एकेरी वाहतुकीचा पर्याय समोर आला असुन त्या साठी बायपास रस्ता मंजुर करण्यात आला आहे. वेण्णालेक येथुन वाहतुक वळविण्यात येणार आहे. ही वाहतुक पुढे धनगरवाडा मार्गे अप्सरा हॉटेल येथुन मुख्य रस्त्यावरून शहरात वळविली जाणार आहे. या साठी १७५० मिटर लांबीचा रस्ता एक छोटा पुल व वेण्णालेक येथील सांडव्याखाली एक कमाणी पुल बांधण्यात येणार आहे. अप्सरा हॉटेल पासुन १३०० मिटर रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण या कामासाठी १० कोटी तर पुढे ४५० मिटर लांब रस्ता व ३० मिटर गाळयांचा कमाणी पुल या कामासाठी १५ कोटी रूपये असे एकुन या बायपास रस्त्याच्या कामासाठी २५ कोटी रूपयांचा निधी मंजुर झाला आहे अशी माहीती राष्ट्रवादी कॉग्रेसच्या पदाधिकारी यांनी दिली. गेली अनेक वर्षे विविध प्रकारच्या परवाणगीच्या चक्रात या बायपास रस्त्याचे काम रखडले होते. या कामात मदत व पुर्नवसन मंत्री ना मकरंद पाटील यांनी लक्ष घातले. त्यांनी या प्रकल्पाचा पाठपुरावा केला.
या कामी वन मंत्री ना. गणेश नाईक यांनी देखिल ना. मकरंद पाटील यांना मोलाची मदत केली. या कामातील अखेरची वन विभागासह राष्ट्रीय वन्यजीव मंडळ यांची देखिल परवाणगी मिळाली. या कामासाठी वन विभागाने ७८ गुंठे जागा या प्रकल्पासाठी उपलब्ध करून दिल्याने या कामातील सर्व अडथळे दुर झाले आहेत. या प्रकल्पामुळे पर्यटकांना वाहतूक कोंडीतून दिलासा मिळणार आहे.
वेण्णालेक बायपास रस्त्यावर बांधण्यात येणारा कमाणी पुल हा पर्यटकांचे मुख्य आकर्षण ठरणार आहे. या पुलावरून पर्यटकांना पावसाळयात वेण्णा धरणाच्या सांडव्या वरून वाहणारे पाण्याचे जसेच जंगलाचे विहंगम दृश्य पाहता येणार असल्याने हे ठिकाण पर्यटकांसाठी पर्वणी ठरेल असा विश्वास सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अधिकारी अजय देशपांडे यांनी व्यक्त केला.
या बायपास रस्त्याच्या कामाचा पाठपुरावा मदत व पुर्नवसन मंत्री यांनी केल्याने येथील राष्ट्रवादी कॉग्रेसच्या पदाधिकारी यांनी ना. मकरंद पाटील यांच्या बाबत कृतज्ञता व्यक्त केली आहे. या वेळी माजी नगराध्यक्ष किसनसेठ शिंदे, विशाल तोष्णीवाल, श्रीमती विमलताई पार्टे, सुनील शेठ शिंदे, युसुफ शेख, अफझल सुतार, संदिप साळुंखे, प्रकाश पाटील, अर्बन बँकेचे अध्यक्ष समीर सुतार, दत्ता वाडकर, शरद बावळेकर, विशाल तोष्णिवाल, रोहित ढेबे, तौफीक पटवेकर, अशोक शिंदे, अनिकेत रिंगे, ज्योती वागदरे, भक्ती जाधव, सुरेखा देवकर, अशोक शिंदे, अनिकेत रिंगे आदि पदाधिकारी उपस्थित होते.
