Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » हिंदवी पब्लिक स्कूल सातारा येथे महात्मा गांधी जयंती व लालबहादूर शास्त्री जयंती मोठ्या उत्साहात साजरी.

हिंदवी पब्लिक स्कूल सातारा येथे महात्मा गांधी जयंती व लालबहादूर शास्त्री जयंती मोठ्या उत्साहात साजरी.

हिंदवी पब्लिक स्कूल सातारा येथे महात्मा गांधी जयंती व लालबहादूर शास्त्री जयंती मोठ्या उत्साहात साजरी.

सातारा – हिंदवी पब्लिक स्कूल सातारा येथे महात्मा गांधीजी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमासाठी शाळेचे अध्यक्ष मा. श्री अमित कुलकर्णी, हिंदवी पंचकोषाधारीत गुरुकुलच्या संचालिका मा. सौ. रमणी कुलकर्णी, गुरुकुल प्रमुख मा. श्री. संदीप जाधव, शाळेच्या मुख्याध्यापिका मा. ज्योती काटकर तसेच शाळेच्या उपमुख्याध्यापिका मा. सौ. शिल्पा पाटील इत्यादी मान्यवर उपस्थित होते. सर्व मान्यवरांच्या हस्ते राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले.

        सर्व मान्यवरांचे पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. शाळेच्या उपमुख्याध्यापिका मा. सौ. शिल्पा पाटील तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका मा. ज्योती काटकर यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना सध्याची आदर्श जीवनमूल्ये यावर आधारित अनमोल असे मार्गदर्शन केले. तसेच सर्व विद्यार्थ्यांना पूज्य महात्मा गांधी तसेच आदरणीय लाल बहादूर शास्त्री यांच्या जीवनावर आधारित आदर्श अशी चित्रफिती दाखवण्यात आली. या कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्व विद्यार्थ्यांना त्यांचे आदर्श मूल्ये जोपासता यावे या हेतूने कार्यक्रमाचे उत्तमरीत्या सादरीकरण करून महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती हा कार्यक्रम अतिशय उत्साहात पार पडला.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

प्रशासनाच्या प्रभावी नियोजनात पाचगणी नगरपरिषद निवडणूक शांततेत पार

Post Views: 25 प्रशासनाच्या प्रभावी नियोजनात पाचगणी नगरपरिषद निवडणूक शांततेत पार पाचगणी- पाचगणी गिरीस्थान नगरपरिषद निवडणूक २०२५ प्रशासनाच्या काटेकोर नियोजनात

Live Cricket