सातारा हॉस्पिटलच्या आरोग्य तपासणी शिबिरास मेढा व कवठे येथे प्रतिसाद
सातारा, दि. २ : सातारा हॉस्पिटल व सातारा डायग्नोस्टिक सेंटरने मेढा (ता. जावळी) व कवठे (ता. वाई) येथे झालेल्या मोफत आरोग्य तपासणी शिबिराला उदंड प्रतिसाद मिळाला. या शिबिरात सुमारे २०० नागरिकांची तपासणी करण्यात आली.
डॉ. सर्वटे, आग्रवाल क्लिनिक, आपला दवाखाना मेढा व प्रा. आरोग्य केंद्र केळघर यांच्या संयुक्त विद्यमाने मेढा येथे शिबिर पार पडले. स्वस्थ नारी सशक्त नारी परिवार अभियान अंतर्गत हे शिबिर घेण्यात आले. यात रक्त शर्करा, रक्त दाब गरजेनुसार ईसीजी करण्यात आला. ऑर्थोपेडीक सर्जन डॉ. कपिल जगताप यांनी नागरिकची मोफत गुडघे, खुबे, खांदे तपासणी करून मार्गदर्शन केले.
याशिवाय मोफत नेत्र तपासणीही करण्यात आली. याशिबिराचा सुमारे ९० नागरिकांनी लाभ घेतला. डॉ. अमित ढाणे, डॉ. कुलकर्णी, डॉ. ऐश्वर्या ढाणे यांच्या उपस्थितीत सातारा हॉस्पिटल अँड डायग्नोस्टिक सेंटरचे जनसंपर्क अधिकारी श्रीकांत देशमुख, नर्सिंग स्टाफ इन्चार्ज ब्रदर निलेश काळे, राजमाता नर्सिंग स्कूलचे प्रशिक्षणातील विद्यार्थी, तसेच डॉक्टर सरवटे, अग्रवाल आय क्लिनिकचा स्टाफ निखिल महाजन व अन्य सहकारी सहभागी झाले होते.
दरम्यान, सानपाडा येथे सुरज हॉस्पिटलच्या सेवेत असलेले कवठे येथील संतोष पाटील यांच्या पुढाकाराने जय भवानी नवरात्र उत्सव मंडळाच्या रौप्य महोत्सवी वर्षपूर्ती निमित्त कवठे येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर झाले. सातारा हॉस्पिटल अँड डायग्नोस्टिक सेंटर व कवठेवप्राथमिक आरोग्य केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या शिबिराचा सुमारे ११० नागरिकांनी लाभ घेतला.
