Home » ठळक बातम्या » फलटण येथे वरिष्ठ दिवाणी न्यायालय स्थापन

फलटण येथे वरिष्ठ दिवाणी न्यायालय स्थापन

फलटण येथे वरिष्ठ दिवाणी न्यायालय स्थापन करण्यास राज्यमंत्री मंडळाची मंजुरी 

सातारा : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सातारा जिल्ह्यातील फलटण येथे वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय स्थापन करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. न्यायालयासाठी आवश्यक पदांची निर्मिती व खर्चाची तरतूद करण्यासही सरकारने मंजुरी दिली आहे.

या निर्णयामुळे फलटण तालुक्यासह आसपासच्या भागातील नागरिकांना आता न्याय मिळवण्यासाठी सातारा जिल्हा मुख्यालयाकडे जाण्याची गरज राहणार नाही. त्यामुळे वेळ, श्रम व खर्चाची मोठी बचत होऊन न्याय मिळवण्याची प्रक्रिया अधिक सुलभ होणार आहे.न्यायव्यवस्थेच्या बळकटीसाठी उचललेले हे पाऊल जिल्ह्यातील जनतेसाठी दिलासादायक ठरणार असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.

 वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय फलटण येथे स्थापन व्हावे, यासाठी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सातत्याने मागणी केली होती. विशेषतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे त्यांनी साठी सातत्याने पाठपुरावा केला होता.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

धन्वंतरी पतसंस्थेच्या यशाचे मर्म धन्वंतरी पतसंस्थेचा आज ३६ वा वर्धापनदिन 

Post Views: 23 धन्वंतरी पतसंस्थेच्या यशाचे मर्म धन्वंतरी पतसंस्थेचा आज ३६ वा वर्धापनदिन  आजवरच्या वाटचालीत त्यांनी काळानुरुप केलल्या सुधारणा, आव्हानांचा

Live Cricket