Home » देश » धार्मिक » ओढावलेल्या पूरसंकटाच्या पार्श्वभुमीवर शाही दसरा अत्यंत साधेपणाने होणार.

ओढावलेल्या पूरसंकटाच्या पार्श्वभुमीवर शाही दसरा अत्यंत साधेपणाने होणार.

ओढावलेल्या पूरसंकटाच्या पार्श्वभुमीवर शाही दसरा अत्यंत साधेपणाने होणार.

जनता जनार्दनानेही शक्य होईल तितकी मदत पूरबाधितांसाठी सहाय्य म्हणून करावी.

 सातारा -महाराष्ट्रात विशेषकरुन मराठवाडा, कोकण, सातारा जिल्हयातील पूर्व भाग तसेच एकंदरीत संपूर्ण देशात वरुणराजाने हाहा:कार माजवला आहे. पूरबाधितांच्या गंभीर परिस्थितीचे पार्श्वभुमीवर , दि. २ आक्टोंबर २५ रोजीचा सातारचा विजयादशमी सिमोल्लंघन सोहळा अतिशय साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

शासनाचा यावर्षीचा निधी पूरबाधितांच्या मदत कार्यासाठी परस्पर वर्ग करावा तसेच जनता जनार्दनानेही माणुसकीच्या भावनेतुन शक्य असेल ती मदत जिल्हाधिकारी यांचे मार्फत मुख्यमंत्री पूरग्रस्त सहाय्यता निधीमध्ये करावी असे आवाहन खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी केले आहे.  

गेल्या काही दिवसापासून संपूर्ण देशभरात आणि विशेषकरुन महाराष्टराज्यात पावसाने थैमान घातले आहे. अनेक ठिकाणी जीवित आणि मोठया प्रमाणात वित्तहानी झाली आहे. पशुधनाचेही मोठे नुकसान झाले आहे. बळीराजा शेतकरी तर उध्वस्त झाला आहे. शहरी तसेच ग्रामिण भागात मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. एकंदरीत जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. अश्या परिस्थितीत सातारचा शाही विजयादशमी आणि सिमोल्लंघन सोहळा थाटामाटात, धूमधडाक्यात, डामडौलात करणे हे किमान आमच्या मनाला पटणारे नाही. पावसामुळे मराठवाडयासह हाहाक्कार झालेल्या ठिकाणी मोठया मदतीची गरज आहे. त्यामुळे शाही दसरा अत्यंत साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रत्येक नागरीकाने एक भारतीय म्हणून पूरबाधितांच्या मदत कार्यासाठी शक्य होईल तितकी आर्थिक किंवा वस्तु किंवा धान्य स्वरुपातील मदत, जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापन कक्षातील मुख्यमंत्री पूरग्रस्त सहाय्यता निधीमध्ये जमा करावी असे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले नीं आवाहन केले.

 

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

जोसेफ विजय फ्लोअर टेस्टमध्येही पास!

जोसेफ विजय फ्लोअर टेस्टमध्येही पास! तमिळनाडू विधानसभेत विश्वासदर्शक ठराव बहुमताने जिंकले तमिळनाडू विधानसभेत बुधवारी झालेल्या विश्वासदर्शक ठरावादरम्यान तमिळगा वेत्री कळघम 

Live Cricket