नायगावात रंगणार भक्तीचा जागर; ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाला उद्यापासून प्रारंभ शेखर गोरे १ सप्टेंबरला शिवसेनेत प्रवेश करणार; माण-खटावच्या राजकारणात नवे समीकरण राष्ट्रीय महामार्गावर विदेशी दारूची अवैद्य वाहतुक करणारे दोन जण ताब्यात ६ लाख १९ हजारांचा मुद्देमाल जप्त खंडाळा पोलीस स्टेशनची धडाकेबाज कारवाई महाबळेश्वर: एम. ई. एस. इंग्लिश मीडियम हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी नगराध्यक्ष सुनील शिंदे यांना बांधली राखी; रक्षाबंधन सोहळा उत्साहात संपन्न केळघर बाजारपेठेत झेब्रा क्रॉसिंग, स्पीड ब्रेकर बसवा; अन्यथा आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाची प्रशासनाकडे मागणी; नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करण्याचे आवाहन जि. प. सदस्या कविता ओंबळे यांची मागणी; जावळीतील शासकीय कार्यालयांत बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो लावण्याचे आवाहन
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » किसन वीर’चा दसऱ्याला बॉयलर प्रदिपन समारंभ

किसन वीर’चा दसऱ्याला बॉयलर प्रदिपन समारंभ

किसन वीर’चा दसऱ्याला बॉयलर प्रदिपन समारंभ

दि. ३०/९/२५ : भुईज येथील किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्याचा सन २०२५-२६ च्या गळित हंगामाचा बॉयलर अग्निप्रदिपन समारंभ दसऱ्याच्या शुभमुहर्तावर गुरूवार (दि.२) सकाळी ११.३० वाजता राज्याचे मदत, पुनर्वसन मंत्री तथा पालकमंत्री बुलढाणा जिल्हा व कारखान्याचे चेअरमन नामदार मकरंदआबा पाटील व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. अर्चनाताई मकरंद पाटील यांच्या शुभहस्ते होणार असल्याची माहिती, किसन वीर कारखान्याचे व्हाईस चेअरमन प्रमोद शिंदे यांनी दिली.

याबाबत प्रसिद्वीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, किसन वीर व किसन वीर-खंडाळा या दोन्ही कारखान्यावरील तोडणी यंत्रणाही लवकरच कार्यस्थळावर दाखल होणार असुन दोन्ही कारखान्यातील अंतर्गत कामेही पुर्णत्वास गेलेली आहेत. त्यामुळे निर्धारित वेळेत किसन वीर व खंडाळा कारखाना सुरू होऊन शेतकऱ्यांचा ऊसही वेळेत तुटणार असल्याचे श्री. शिंदे यांनी सांगितले आहे.

या बॉयलर अग्नि प्रदिपन समारंभास कारखाना कार्यक्षेत्रातील सर्व सभासद बंधू-भगिनी, हितचितक, कंत्राटदार, वाहन मालक आणि कार्यकर्त्यानी उपस्थित रहावे, असे आवाहन व्हाईस चेअरमन प्रमोद शिदे, कार्यकारी संचालक जितेंद्र रणवरे व कारखान्याच्या संचालक मंडळाने केले आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

नायगावात रंगणार भक्तीचा जागर; ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाला उद्यापासून प्रारंभ

नायगाव येथे उद्यापासून ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळा केळघर/प्रतिनिधी : कोरेगाव तालुक्यातील नायगाव येथे श्री ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळा व अखंड

केळघर बाजारपेठेत झेब्रा क्रॉसिंग, स्पीड ब्रेकर बसवा; अन्यथा आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाची प्रशासनाकडे मागणी; नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करण्याचे आवाहन

Live Cricket