Home » राज्य » प्रशासकीय » मेढा येथे सेवा पंधरवड्याचा भव्य तालुका स्तरीय प्रारंभ

मेढा येथे सेवा पंधरवड्याचा भव्य तालुका स्तरीय प्रारंभ

मेढा येथे सेवा पंधरवड्याचा भव्य तालुका स्तरीय प्रारंभ

मंत्री छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते उद्या कलश मंगल कार्यालयात कार्यक्रम

केळघर, ता. २८ – उपविभागीय अधिकारी कार्यालय सातारा व तहसील कार्यालय जावळी यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनापासून (१७ सप्टेंबर) महात्मा गांधी जयंतीपर्यंत (२ ऑक्टोबर) सेवा पंधरवडा साजरा केला जाणार आहे.

तालुका स्तरीय कार्यक्रमाचा उद्या सोमवारी (ता. २९) मेढा येथील कलश मंगल कार्यालयात दुपारी साडे बारास प्रारंभ होईल. हा कार्यक्रम सार्वजनिक बांधकाममंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते सुरू होईल. यावेळी जिल्हाधिकारी संतोष पाटील, प्रांताधिकारी सातारा आशिष बारकुल आणि प्रांताधिकारी जावळी विकास व्यवहारे उपस्थित राहणार आहेत.

तहसीलदार हणमंत कोळेकर आणि नायब तहसीलदार संजय बैलकर यांनी नागरिकांना या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे, ज्यामध्ये विविध सामाजिक आणि सार्वजनिक सेवा उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

धन्वंतरी पतसंस्थेच्या यशाचे मर्म धन्वंतरी पतसंस्थेचा आज ३६ वा वर्धापनदिन 

Post Views: 29 धन्वंतरी पतसंस्थेच्या यशाचे मर्म धन्वंतरी पतसंस्थेचा आज ३६ वा वर्धापनदिन  आजवरच्या वाटचालीत त्यांनी काळानुरुप केलल्या सुधारणा, आव्हानांचा

Live Cricket