Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » युवा नेतृत्व विकास दिनकर शिंदे यांची शिवसेनेत महत्वपूर्ण नियुक्ती

युवा नेतृत्व विकास दिनकर शिंदे यांची शिवसेनेत महत्वपूर्ण नियुक्ती

युवा नेतृत्व विकास दिनकर शिंदे यांची शिवसेनेत महत्वपूर्ण नियुक्ती

सातारा –शिवसेना (शिंदे गट) पक्षप्रमुख, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा जिल्ह्यातील विकास दिनकर शिंदे यांची पक्षाच्या महत्वाच्या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. मध्यवर्ती कार्यालय, शिवसेना यांच्याकडून २५ सप्टेंबर २०२५ रोजी अधिकृत नियुक्तीपत्र जारी करण्यात आले.

शिवसेना (शिंदे गट) पक्षप्रमुख उपमुख्यमंत्री एकनाथ  शिंदे यांच्या आदेशानुसार  वाई  तालुक्यातील युवा संघटक विकास दिनकर शिंदे यांची शिवसेना पक्षाच्या प्रभारी उपजिल्हाप्रमुख कार्यक्षेत्र वाई खंडाळा महाबळेश्वर पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

एक वर्षासाठी नियुक्ती

या नियुक्तीपत्रानुसार, विकास दिनकर शिंदे यांची एक वर्ष कालावधीसाठी नियुक्ती करण्यात आली आहे. पक्ष संघटन बळकट करणे, विचारधारा रुजवणे आणि कार्यकर्त्यांमध्ये एकजूट निर्माण करणे या दृष्टीने त्यांच्यावर महत्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

ठाकरे आणि दिघे यांच्या विचारांचा प्रसार

पत्रात म्हटले आहे की, “हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार आणि धर्मवीर आनंद दिघे यांची शिकवण या दोन्हींचा प्रसार करण्यासाठी आपण प्रयत्नशील राहावे,” अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. तसेच, शिवसेना पक्षासाठी सर्वांना सोबत घेऊन कार्य करावे, असेही निर्देश देण्यात आले आहेत.

साताऱ्यातील संघटनात्मक कार्याला गती

विकास शिंदे यांच्या नियुक्तीमुळे सातारा जिल्ह्यातील शिंदे गटाच्या संघटनात्मक कार्याला गती मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. जिल्ह्यातील तरुण कार्यकर्त्यांना पक्षाशी जोडून ठेवण्याचे आणि आगामी निवडणुकांसाठी मजबूत पायाभूत रचना उभारण्याचे काम त्यांच्याकडे सोपवण्यात आले आहे.

शुभेच्छांचा वर्षाव

या नियुक्तीनंतर स्थानिक पातळीवरून शिंदे यांना शुभेच्छांचा वर्षाव होत असून, पक्षाच्या कामकाजात नवचैतन्य निर्माण होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

 

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

कोटा ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स तर्फे सोलापूरमधील पूरग्रस्त विद्यार्थ्यांना मदतीचा हात

Post Views: 7 कोटा ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स तर्फे सोलापूरमधील पूरग्रस्त विद्यार्थ्यांना मदतीचा हात . एकतेचे प्रतीक म्हणून, कराडमधील कोटा

Live Cricket