सातारा डायग्नोस्टिक सेंटरमध्ये लिव्हर केअर सेंटरचा शुभारंभ
सातारा, दि. २७ : सातारा डायग्नोस्टिक सेंटर मध्ये पांचभौतिक चिकित्सक डॉ. स्वप्नील सुहास जोशी यांच्या लिव्हर (यकृत) केअर सेंटरचा शुभारंभ प्रथितयश इंटरव्हेंशनल कार्डिओलॉजिस्ट डॉ. जगदीश हिरेमठ यांच्या हस्ते झाला.
सातारा हॉस्पिटल अँड सातारा डायग्नोस्टिक सेंटरचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. सुरेश शिंदे, कार्डिओलॉजिस्ट डॉ. मधुसूदन आसावा, दैनिक ऐक्यचे संपादक शैलेंद्र पळणीटकर, डॉ मृणालिनी जोशी,सातारा हॉस्पिटल ग्रुपचे मुख्यकार्यकारी अधिकारी विक्रमसिंह शिंदे आदी प्रमुख उपस्थित होते.
सातारा डायग्नोस्टिक सेंटर मध्ये एकाच छताखाली सर्व चाचण्या, तपासण्या व तज्ञ डॉक्टरांची उपलब्धता असल्यामुळे लिव्हर आणि आजारी रुग्णांना या सेवेचा लाभ घेण्याची संधी डॉ. स्वप्नील जोशी व सातारा डायग्नोस्टिक सेंटर यांनी उपलब्ध केली आहे. गरजू रुग्णांना या सेवेचा निश्चित लाभ होईल, असे गौरवोद्गार डॉ. जगदीश हिरेमठ यांनी यानिमित्ताने बोलताना काढले.
ॲलोपॅथी म्हणजे आधुनिक औषध पद्धती आणि आयुर्वेद शास्त्र यांच्या संयोगातून एकाच ठिकाणी लिव्हरच्या आरोग्याची काळजी या सेंटरवर घेतली जाते, असे पांचभौतिक चिकित्सक डॉ. स्वप्नील सुहास जोशी यांनी सांगितले. सातारा डायग्नोस्टिक सेंटर अँड मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे दर सोमवारी दुपारी ३ ते ५ या वेळेत रुग्णांनी या केंद्राचा लाभ घ्यावा, अधिक माहितीसाठी 9168432432 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन यानिमित्ताने करण्यात आले आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पब्लिक रिलेशन विभागाचे व्यवस्थापक श्रीकांत देशमुख यांनी केले. डॉ. सुहास जोशी यांनी आभार मानले. डॉ. निलेश साबळे, ॲड. श्वेतांबरी पवार, हेमंत रणपिसे आदी मान्यवर उपस्थित होते.





