अतिवृष्टीग्रस्त भागाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पाहणी
सोलापूर, ता. २४ सप्टेंबर :माढा तालुक्यातील दारफळ येथे झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर शेतीचे व घरांचे नुकसान झाले आहे. या भागाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (२४ सप्टेंबर) प्रत्यक्ष पाहणी केली.
या दौऱ्यात मुख्यमंत्री फडणवीस यांनी थेट शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांची अडचण जाणून घेतली. अतिवृष्टीमुळे उध्वस्त झालेल्या शेतपिकांचे, घरांचे व मालमत्तेचे नुकसान त्यांनी प्रत्यक्ष पाहिले. शेतकऱ्यांना धीर देताना तातडीने मदत व शासकीय मदतीच्या उपाययोजनांचा आढावा त्यांनी घेतला.या पाहणीवेळी मंत्री जयकुमार गोरे तसेच संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.




