Post Views: 118
राज्यात २ दिवस मुसळधार पावसाचा इशारा
हवामान विभागाचा इशारा – नागरिकांनी खबरदारी घ्यावी
पुणे | राज्यात पुन्हा एकदा पावसाची जोरदार हजेरी लागणार आहे. हवामान विभागाने पुढील २ दिवसांसाठी मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. विशेषतः कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भातील काही भागांमध्ये जोरदार सरींचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
मान्सूनच्या शेवटच्या टप्प्यात वातावरणात बदल होत असून, काही ठिकाणी वीजांसह पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पिकांचे संरक्षण करण्याबरोबरच नागरिकांनीही आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन हवामान खात्याने केले आहे.





