शाहूनगर च्या लोकसेवेचा जिव्हाळ्याचा मार्ग-माणसं जिंकणारा उद्योजक सागर भोसले
सातारा |व्यवसायातून यश मिळवणे हे बहुतेकांचे ध्येय असते, पण समाजाची सेवा करणे, इतरांना संधी देणे आणि लोकांच्या जीवनात बदल घडवणे, हे खरे ध्येय काही जणच ठरवतात. अशाच जिद्दी आणि दूरदर्शी उद्योजकांपैकी एक नाव म्हणजे सागर भोसले, ज्यांचा (23 सप्टेंबर) वाढदिवस आहे.
व्यवसायात जिद्द आणि धोरण
सागर भोसले हे केवळ व्यवसायासाठी नव्हे, तर ग्राहकांचा विश्वास जिंकण्यासाठी काम करतात. महाराष्ट्र राज्यात प्रसिद्ध असलेले जी केम वॉटर प्युअर फायर आणि आटा चक्की , हॉटेल महाराजा ग्राहकांच्या पसंतीचे ब्रँड ठरलेले आहेत.
सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मुंबईसह गुजरात आणि राजस्थानमध्ये त्यांनी स्वतःची भलीमोठी टीम उभी केली. सर्वसामान्य घरातील तरुणांना संधी देऊन त्यांनी सर्वांची उज्ज्वल भविष्याकडे वाटचाल सुनिश्चित केली.
युवकांना व्यवसायाची संधी
अनंत ट्रेडिंग कॉर्पोरेशन, जी-केम आटाचक्की आणि हॉटेल महाराजा पॅलेस, बोरगाव या व्यवसायांतून त्यांनी महाराष्ट्रभर फ्रेंचायसीज उभारल्या.हे पाऊल फक्त व्यवसाय वाढीसाठी नव्हते, तर युवकांच्या जीवनात नवीन दालन उघडण्यासाठी होते.
समाजसेवा आणि मानवी मूल्ये
सागर भोसले हे प्रत्येक सामाजिक उपक्रमात पुढाकार घेतात. बरेच वर्ष त्रिशंकू म्हणून दुर्लक्षित शाहूनगर ला खऱ्या अर्थाने विकासात्मक वाटचाल करण्याबरोबर शाहूनगर चा विकास करण्याचे खरे श्रेय सागर भोसले यांना जाते.
झोपडपट्टीतील लोकांना वॉटर प्युरिफायर
दिव्यांगांना चटई
गरीब विद्यार्थ्यांना वह्या-पुस्तके, दफ्तर
खेळाडूंना आर्थिक मदत
वृक्षारोपण आणि स्वच्छता उपक्रम
कोरोना काळात केलेली मदत:
मोफत ऑक्सिजन मशिन सेवा
जम्बो कोविड हॉस्पिटलला अन्नदान
भोसलेवाडी कोविड केअर सेंटरची उभारणी
गरजू लोकांना अन्नधान्य व फळांची मदत
रिक्षाचालकांसाठी विमा कवच
मतिमंद मुलांच्या शाळेसाठी मदत यासारखे अनेक सामाजिक उपक्रम सागर भोसले यांनी शाहूनगर मध्ये राबविले आहेत. ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत आरोग्य शिबिर असो किंवा शासकीय योजना सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचण्याची त्यांची तळमळ सामाजिक कार्यातून दिसून येत आहे.
सैनिकांविषयी आदर
सागर भोसले यांनी सैनिकांविषयी असलेला आदर व्यवसायातही व्यक्त केला आहे. फक्त व्यवसायाचे नव्हे, तर मानवी मूल्यांचे दर्शन देखील घडवते.
कुटुंबाचा मोलाचा आधार
सागर सरांच्या कार्यात पत्नी, मुले, आई-वडील आणि भाऊ यांचा कायमच मोलाचा वाटा आहे.सागर भोसले कुटुंबाची सामाजिक बांधिलकी पाहून खासदार उदयनराजे भोसले देखील नेहमी कौतुक करतात.
प्रेरणादायी संदेश
सागर भोसले यांनी फक्त व्यवसायात यश मिळवलेले नाही, तर समाजासाठी योगदान देणे, युवकांना संधी देणे आणि माणसं जिंकणे हे ध्येय आपल्या जीवनात उंचावले आहे.आपल्या या कार्याने लाखो लोकांचे जीवन उजळले आहे आणि तुम्ही समाजासाठी केलेले योगदान सत्यातल्या समाजसेवकाचे दर्शन घडवते.
या वाढदिवसानिमित्त, तुम्हाला उत्तम आरोग्य, प्रचंड ऊर्जा, आणि दीर्घायुष्य लाभो, तसेच तुमच्या सामाजिक कार्याची प्रेरणा अनेक पिढ्यांपर्यंत पोहोचो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
अली मुजावर,
पत्रकार सातारा न्यूज मीडिया सेवन
