लोकप्रिय आसामी गायक झुबीन गर्गच्या निधनाने देशभरातील चाहत्यांना मोठा धक्का
लोकप्रिय आसामी गायक झुबीन गर्गच्या निधनाने देशभरातील चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. सिंगापूरमध्ये नॉर्थ ईस्ट इंडिया फेस्टिव्हलमध्ये परफॉर्म करण्यासाठी गेलेल्या झुबीनचा तिथे स्कूबा डाइव्हिंगदरम्यान मृत्यू झाला. जेव्हा त्याचं पार्थिव गुवाहाटी विमानतळावर पोहोचलं, तेव्हा त्याला अंतिम निरोप देण्यासाठी जनसागर लोटला होता. प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू होते. झुबीनच्या मृत्यूबाबत बऱ्याच शंका उपस्थित केल्या जात होत्या. आता आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी सिंगापूर सरकारद्वारे जारी केलेल्या झुबीनच्या मृत्यू प्रमाणपत्राचा खुलासा केला आहे. या प्रमाणपत्रानुसार झुबीनचा मृत्यू पाण्यात बुडाल्याने झाला आहे. त्याच्या पार्थिवावर गुवाहाटीजवळील गावात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जातील.
‘या अली’, ‘जाने क्या चाहे मन बावरा’ यांसारख्या ब्लॉकबस्टर गाण्यांचा गायक झुबीन गर्ग चाहत्यांना सोडून गेला आहे
