शालेय ज़िल्हास्तरीय जिमनास्टिक स्पर्धेत वाई व्यायाम शाळेने उल्लेखनीय यश
केळघर प्रतिनिधी:शालेय ज़िल्हास्तरीय जिमनास्टिक स्पर्धेत वाई व्यायाम शाळेने उल्लेखनीय यश संपादन केले आहे. शाळेचे यशस्वी विद्यार्थी पुढीलप्रमाणे १४ वर्षांखालील मुले वयोगटात आयुष खडसरे याने प्रथम क्रमांक मिळवला आहे. तर ओम शेलार याने द्वितीय क्रमांक मिळवला आहे.अभिर पोळ याने चतुर्थ क्रमांक मिळवला आहे.
१४ वर्षांखालील मुली या वयोगटात श्वेता जाधव हिने प्रथम क्रमांक,आरती मांढरे हिने द्वितीय क्रमांक तर कनिष्का हगीर हिने तृतीय क्रमांक व स्वाती बंजारा हिने चतुर्थ क्रमांक मिळवला आहे .
१४वर्षांखालील मुली या वयोगटात (रिदमिक जिमनास्टिक)
अपेक्षा साळुंखे हिने प्रथम क्रमांक
ईश्वरी कांबळे हिने द्वितीय क्रमांकमिळवला आहे .
तसेच १७वर्षांखालील मुली या वयोगटात वैष्णवी क्षीरसागर हिने प्रथम क्रमांक तसेच आत्मिका गाढवे हिने द्वितीय क्रमांक मिळवला आहे.अतुल बावडेकर , प्रशांत राजपूत, रोहन देशपांडे ,कुणाल भिलारे या प्रशिक्षकांकडून सर्व खेळाडूंना मार्गदर्शन लाभले .यशस्वी विद्यार्थ्यांचे मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.





