Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » उद्योगजगत » ब्राउन पेपर टेक्नॉलॉजीजला कामगारांची लाखो रुपयांची देणी देण्याचे कामगार न्यायालयाचे आदेश

ब्राउन पेपर टेक्नॉलॉजीजला कामगारांची लाखो रुपयांची देणी देण्याचे कामगार न्यायालयाचे आदेश

ब्राउन पेपर टेक्नॉलॉजीजला कामगारांची लाखो रुपयांची देणी देण्याचे कामगार न्यायालयाचे आदेश

सातारा, दि.17 सप्टेंबर-शिरवळ येथील ब्राउन पेपर टेक्नॉलॉजीज लिमिटेड या कंपनीला कामगारांची लाखो रुपयांची थकीत देणी देण्याचे आदेश सातारा कामगार न्यायालयाने दिले आहेत. 2004 पासून कंपनी बंद पडल्याने शेकडो कामगारांचे पगार, भत्ते आणि निवृत्तीवेतन अडकून राहिले होते.

सन 1982 पासून सुरू झालेली ही पेपर मिल परिसरातील रोजगाराचे मोठे साधन ठरली होती. मात्र 1999-2000 दरम्यान कंपनीचे व्यवस्थापन बदलल्यानंतर अडचणी वाढल्या. अखेर 2004 पासून उत्पादन थांबल्याने हजारो कामगार संकटात सापडले.

कामगारांच्या वतीने दाखल झालेल्या अर्जावर सुनावणी करताना कामगार न्यायालय, औद्योगिक न्यायालय तसेच उच्च न्यायालय यांनी कामगारांच्या हक्काची रक्कम देण्याचे आदेश दिले. परंतु कंपनीने हे आदेश न पाळल्याने कामगारांना न्याय मिळेना. अखेर कामगार संघटनेचे अध्यक्ष रोजी हसन काजी उपाध्यक्ष विठ्ठल दगडे ज्ञानेश्वर कावळे पदाधिकारी बाळू राऊत राजू चव्हाण गणेश शेळके व इतर कामगार प्रतिनिधी  अधिवक्ता रवींद्र जाधव यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे कामगार न्यायालयाने आता कंपनीला थकीत देणी अदा करण्याचा अंतिम आदेश दिला आहे.

या निर्णयामुळे शिरळ व परिसरातील कामगारांमध्ये समाधानाची लाट उसळली आहे. दीर्घकाळ प्रलंबित असलेला लढा अखेर न्यायालयाच्या आदेशामुळे यशस्वी ठरला आहे.

 

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

Live Cricket