आयएएस ऑफिसर कांतीलाल उमाप यांची कोटा अकॅडमीस भेट .
कराड प्रतिनिधी :महाराष्ट्राचे माजी एक्साईज आयुक्त व तंत्रशिक्षण उपसचिव व आयएएस अधिकारी श्री कांतीलाल उमाप यांनी नुकतीच कराड येथील कोटा ज्युनिअर कॉलेज व कोटा अकॅडमीस सदिच्छा भेट दिली . यावेळेस त्यांनी कोटा ज्युनिअर कॉलेज च्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला व यशस्वी होण्याचा मार्ग सांगितला . यावेळेस त्यांनी कोटा अकॅडमीच्या शिक्षण पद्धती विषयी जाणून घेतले व बहुमूल्य मार्गदर्शन केले . कोटा ज्युनिअर कॉलेज च्या संचालिका मैथिली खुस्पे यांनी विद्यार्थ्यांच्या विविध प्रकल्पांविषयी माहिती दिली . यावेळेस त्यांच्या बरोबर महाराष्ट्र राज्याच्या पशुसंवर्धन विभागाचे माजी आयुक्त श्री परकाळे साहेब उपस्थित होते . यावेळी कोटा अकॅडमी व कोटा ज्युनिअर कॉलेज चे अध्यक्ष डॉ .महेश खुस्पे व उपाध्यक्ष मंजिरी खुस्पे यांनी पाहुण्यांचे शाल व श्रीफळ देऊन स्वागत केले .
यावेळी कोटा ज्युनिअर कॉलेजच्या मुख्याध्यापिका सौ जयश्री पवार , उपमुख्याधापिका सना संडे तसेच शिक्षक सौ सारिका पाटील , सौ सुजाता पवार , जितेंद्र कुमार , बिश्वनाथ बॅनर्जी , श्री पांडे , प्रेम मौर्य हे उपस्थित होते .
