बोपर्डी ग्रामपंचायत ता.वाई चा मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान स्पर्धेत सहभाग-शंकर गाढवे
वाई प्रतिनिधी -महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान निर्णय प्रक्रियेत हिरीरीने सहभागी होऊन यशस्वी होण्यासाठी आयोजित ग्रामपंचायत पातळीवरील कार्यशाळेत मा. सरपंच श्री. शंकर गाढवे यांचे अध्यक्षते खाली आयोजित कार्य शाळेत शासन निर्णया मधील मुख्य उद्देश (घटक) नुसार प्रत्येक विभागाने सहभागी होऊन त्या त्या नुसार कामकाज करून गुणांकन मिळविणे कामी जास्तीत जास्त प्रयत्न करायचे ठरवले.
सदर कार्य शाळेत ग्रामपंचायत विभागाची उद्दिष्टे, महसूल ची उद्दिष्टे, कृषी ची उद्दिष्टे, शिक्षण ची उद्दिष्टे, आरोग्य विभाग उद्दिष्टे, पूर्व प्राथमिक ची उद्दिष्टे यावर गुणांकना नुसार सविस्तर चर्चा होऊन जिथे जिथे कमी आहे त्याची पूर्तता करणे, सर्व विभागानी समन्वयं ठेवणे,याचं बरोबर बचतगट, सार्वजनिक गणेश मंडळ, भजनी मंडळ, महिला मंडळ, युवक मंडळ विविध संस्थाचा सहभाग घेऊन अभियान यशस्वी करण्याचे सर्वानुमते ठरले.
आजच्या ग्रामपंचायत पातळीवरील कार्यशाळेस सन्माननीय उपसरपंच, सर्व सदस्य, ग्रामपंचायत अधिकारी, ग्राममहसूल अधिकारी, सहायक कृषी अधिकारी, मुख्याध्यापक जिप शाळा बोपर्डी व धनगर वस्ती, मुख्याध्यापक हायस्कूल, आरोग्य कर्मचारी, आशा सेविका, ग्रामसंघ अध्यक्ष, सि. आर. पी., बचत गट सदस्य, अंगणवाडी सेविका ग्रामस्थांनी सहभाग घेतला होता.
