उत्कर्ष नागरी सहकारी पतसंस्था, वाई यांच्या वतीने रेवा तांबोळी हिचा सत्कार
भुईंज(ता.वाई)येथील रेवा प्रबोधिनी राहुल तांबोळी हिची आंध्र प्रदेशातील श्रीहरीकोटा येथील भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रो मध्ये प्रशिक्षणासाठी निवड झाली. देशातील अत्यंत गुणवत्तापूर्ण विद्यार्थ्यांमधून तिची निवड झाली आहे.
या यशाबद्दल उत्कर्ष नागरी सहकारी पतसंस्था वाई यांच्या वतीने रेवा तांबोळी हिचे अभिनंदन करण्यात आले व तिला भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. संस्थेच्या चेअरमन श्रीमती अनुराधा कोल्हापूरे, अमर कोल्हापुरे यांनी रेवा हीचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी बाळकृष्ण वाघ (डॅडी) यांनी रेवा हिला शुभेच्छा देताना खूप परिश्रम व कष्टातून हे यश संपादन केले आहे, या आधी रेवा हिने अनेक स्वप्न पाहिली असतील कदाचित ती यशस्वी झाले नसतील मात्र त्या स्वप्नांनी त्यांची झोप उडवली आहे ती पूर्ण केल्याशिवाय त्या थांबणार नाहीत ,त्यामध्ये त्या नक्कीच यशस्वी होणार, असा विश्वास व्यक्त केला.
प्रसंगी संस्थेचे जेष्ठ सभासद बाळकृष्ण वाघ( डॅडी), राजेंद्र इथापे ,राहुल ढाणे, पै.माणिक रामचंद्र पवार ,तारा सोनवणे (मॅडम) पत्रकार जितेंद्र वारागडे व मुख्य व्यवस्थापक श्री प्रकाश पवार तसेच अधिकारी प्रशांत सोनवणे आणि पाचवड शाखा कर्मचारी वृंद उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे एरिया मॅनेजर प्रशांत सोनवणे यांनी केले.
