गौरीशंकर मध्ये अभियंता दिन उत्साहात साजरा.
लिंब-बौद्धिक प्रगल्भता व आधुनिकतेचा ध्यास घेऊन राष्ट्राच्या सर्वांगीण प्रगतीसाठी झटणारे भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांचे मोलाचे योगदान राहिले आहे. भारतातील स्थापत्य क्षेत्राला नवी दिशा देऊन असंख्य महानगरांची पुनर्रचना करताना विकासात्मक तेची दूरदृष्टी ठेवून त्यांनी कार्य केले.त्यांचे कार्य हे स्थापत्य क्षेत्राला दीपस्तंभ प्रमाणे ठरत आहे.संपूर्ण देशभर १५ सप्टेंबर हा राष्ट्रीय अभियंता दिन म्हणून साजरा केला जात आहे.या निमित्ताने गौरीशंकर लिंब कॅम्पस मध्ये भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या पुतळ्यास अभिवादन करून , पुजन संस्थेचे जनसंपर्क अधिकारी श्रीरंग काटेकर यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी अभियंता अमित मडके यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी प्रभारी प्राचार्य घनश्याम चव्हाण, नितीन शिवथरे, राकेश खोपडे, शैला शिंदे, अश्विनी सवाखंडे आदी प्रमुख उपस्थित होते. यावेळी बोलताना संस्थेचे जनसंपर्क अधिकारी श्रीरंग काटेकर म्हणाली की देशातील विविध विकासात्मक प्रकल्प हे दर्जेदार करण्यामध्ये सर विश्वेश्वरय्या यांचे मोलाचे योगदान राहिले आहे रस्ते पूल धरणे बरोबरच म्हैसूर येथील जगप्रसिद्ध वृंदावन गार्डनची स्थापत्य शैली निर्मिती हे त्यांनी करून दाखवली आहे.प्रास्ताविक व आभार प्रभारी प्राचार्य घनश्याम चव्हाण यांनी मानले.
