आता याच महिलांना ST तिकीटात 50 टक्के सवलत महाराष्ट्र सरकारने बदलले नियम.
महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाने (MSRTC) महिलांबद्दल आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी प्रवासात तिकिटाच्या सवलतींमध्ये बदल केला आहे. यापूर्वी महिलांना आणि ज्येष्ठ नागरिकांना एसटी बसचा प्रवास मोफत होता, परंतु तो आता मोफत नसणार आहे. सवलतींचा लाभ घेण्यासाठी महिलांना आणि ज्येष्ठ नागरिकांना राज्य परिवहन मंडळाकडून मिळालेल्या ओळखपत्राच्या मदतीने बसचा प्रवास मोफत होऊ शकतो. सवलतींचा लाभ केवळ पात्र व्यक्तींनाच मिळणार असून यामुळे योजनेची प्रणाली अधिक प्रभावीपणे होण्याचा उद्देश परिवहन मंडळाचा आहे.
महिला प्रवाशांना 50% सवलतीचा लाभ घेण्यासाठी एसटी महामंडळाने एक विशेष ओळखपत्र जारी केले आहे, जे त्यांच्या सोबत असणे अनिवार्य असणार आहे. हे ओळखपत्र नसल्यास, प्रवाशाला पूर्ण तिकीट खरेदी करावी लागणार आहे.
राज्याबाहेर प्रवास करताना, ही सवलत फक्त महाराष्ट्रापर्यंतच लागू होईल, त्यानंतर प्रवाशांना संपूर्ण तिकीट खरेदी करावे लागेल. काही शहरांतर्गत मार्गांवर, जसे की पनवेल ते ठाणे, या सवलतीचा लाभ घेतला जाणार नाही. अशा मार्गांवर प्रवास करताना पूर्ण तिकीट भरणे आवश्यक असेल. या नवीन नियमामुळे महिला प्रवाशांना अधिक सुविधा मिळतील.
ज्येष्ठ नागरिकांसाठी एसटी प्रवासाच्या सवलतीमध्ये काही महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत. 65 ते 75 वयोगटातील पुरुष आणि महिला ज्येष्ठ नागरिकांना एसटी प्रवासावर 50% सवलत मिळणार आहे.तर, 75 वर्षांवरील नागरिकांना एसटी बसमध्ये पूर्णपणे मोफत प्रवास करण्याची सुविधा मिळणार आहे. यामुळे ज्येष्ठ नागरिकांना अधिक सुलभ आणि आरामदायक प्रवास करता येईल. या निर्णयामुळे त्यांना आर्थिक दृष्टिकोनातूनही मोठा फायदा होईल.
