कुडाळ गटात भाजपच्या सौ जयश्रीताई गिरीचां प्रचाराचा झंझावात साताऱ्याच्या अस्मितेला सुरेल सलाम’आम्ही सातारी’ गीताचा मंगळवारी शाहू कलामंदिरात भव्य प्रकाशन सोहळा कोडोलीच्या सुपुत्राचा राष्ट्रीय स्तरावर गौरव; उस्मानाबादी शेळी संवर्धनासाठी ‘NBAGR’ कडून विशेष सन्मान  कुंभरोशी गणात ‘कमळ’ फुलणार? सामाजिक कार्याचा वारसा अन् दांडगा अनुभव असलेले सुरेश जाधव रिंगणात! गौरीशंकर सुखात्मे स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न विद्यार्थ्यांच्या कलाविष्काराचे रसिक प्रेक्षकांकडून झाले कौतुक  लढायचं परिवर्तनासाठी, लढायचं विकासासाठी! – श्री. सुभाष महादेव सोंडकर यांना भाजपची अधिकृत उमेदवारी
Home » ठळक बातम्या » स्पोर्ट्स » सातारच्या दुर्गनाद ट्रेकर्स व ॲडव्हेंचर्सकडून हम्पता पास शिखर सर

सातारच्या दुर्गनाद ट्रेकर्स व ॲडव्हेंचर्सकडून हम्पता पास शिखर सर

सातारच्या दुर्गनाद ट्रेकर्स व ॲडव्हेंचर्सकडून हम्पता पास शिखर सर

छत्रपती शिवाजी महाराज की जय… हर हर महादेव,’ अशा जयघोषाने हिमालयातील हम्पता पास शिखर दुमदुमले. साताराच्या दुर्गनाद ट्रेकर्स व ॲडव्हेंचर्सच्या गिर्यारोहकांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करत वंदन केले. 

दुर्गनाद ट्रेकर्स महाराष्ट्रातील गडकिल्ले, धबधबे, निसर्गाच्या घळी, प्राचीन मंदिर, जंगल ट्रेक, निसर्ग निर्मित पठार, शिवकालीन फरसबंदी मार्ग, डोंगररांगा असे ऑफबीट ट्रेक करण्यासाठी प्रसिद्ध आहे. यावेळी या ट्रेक ग्रुपने हिमालयातील १४००० फुट उंच असणाऱ्या हम्पता पास या ट्रेकचे आयोजन केलेले होते. 

सातारा येथून मुंबई आणि तेथून चंडीगड करत हिमालयातील हम्पता पास या मोहिमेची सुरुवात करण्यात आली. मनाली, जोबरा, चिल्का, बालू का घेरा, हम्पता पास शिखर, सिया घेरू, छतरु, चंद्रताल तलाव हा अवघड समजला जाणारा ट्रेक पूर्ण केला. तब्बल पाच दिवस आणि जवळपास पाच दिवसात हिमालयीन बर्फाच्छादित ५२ तासांची पायपीट करून हम्पता पास शिखराचा माथा गाठण्यात आला. यावेळी मोठ्या पर्वतरांगा, खोल द-या, उंच कडे, खळखळणारे स्वच्छ पांढरेशुभ्र पाण्याचे प्रवाह, बर्फाचा गालिचा, मोठे दगड गोटे, निसरड्या अवघड पायवाटेने जात दुर्गनादच्या ट्रेकर्सनी ही मोहीम यशस्वीपणे पार पाडली.

कमी तापमान, उच्च कोटीची थंडी, दिवसा कडक उन्हाचा तडाका तर रात्री कडाक्याची थंडी आणि त्यातच ऑक्सिजनची कमी, अडचणी आणि आव्हानांना सामोरे जात दुर्गनाद ट्रेकर्स व ॲडव्हेंचर्सच्या गणेश शिंदे, जितेंद्र कदम, विकास कोरडे, महेश कदम, सुरेखा जगदाळे, मधुकर जगदाळे, आयर्नमन डॉ.दीपक निकम, प्रभाकर ढवळे, प्रा.किशोरकुमार शिंदे, बाबू पिटेकर यांनी मोहिम यशस्वीपणे पार पाडली. हा कठीण श्रेणीतील हिमालयीन ट्रेक या सर्व ट्रेकर्सनी सुरक्षितपणे आणि यशस्वीपणे पूर्ण केल्याने सातारा परिसरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

 सातारा आणि सातारा परिसरातून कठीण श्रेणीतील हिमालयीन ट्रेक समिट करण्यासाठी ट्रेकर्स उत्सुक असतात. त्यांना हिमालयीन ट्रेकची अभ्यासपूर्ण संपूर्ण माहिती देऊन हम्पता पास शिखर ट्रेक यशस्वीरीत्या पूर्ण केला. याचे नियोजन आम्ही महिनाभर करत होतो.  

श्री. गणेश शिंदे दुर्गनाद ट्रेकर्स व अॅडव्हेंचर्स, सातारा

 

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

कुडाळ गटात भाजपच्या सौ जयश्रीताई गिरीचां प्रचाराचा झंझावात

कुडाळ गटात भाजपच्या सौ. जयश्रीताई गिरीचां प्रचाराचा झंझावात मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा विश्वास सार्थ ठरवत विजयश्री खेचून आणणार सातारा:जावली तालुक्यात

Live Cricket