Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » इंजबाव ता.माण येते जिल्हा परिषद शाळा नूतन इमारत भूमिपूजन समारंभ संपन्न

इंजबाव ता.माण येते जिल्हा परिषद शाळा नूतन इमारत भूमिपूजन समारंभ संपन्न

इंजबाव ता.माण येते जिल्हा परिषद शाळा नूतन इमारत भूमिपूजन समारंभ संपन्न

सातारा |माण तालुक्यातील इंजबाव येथील जिल्‍हा परिषद प्राथमिक शाळेच्‍या नवीन इमारतीच्या बांधकामाचे भूमीपूजन भारतीय जनता पक्षाच्या कार्यकारणी सदस्या सौ. सोनिया जयकुमार गोरे (वहिनीसाहेब) यांच्या शुभहस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले. ग्रामविकास व पंचायतराज मंत्री मा.ना.श्री.जयकुमार गोरे (भाऊ) यांच्या माध्यमातून सुमारे ४८.७३ लक्ष रुपये या शाळेच्या नूतन इमारतीसाठी मंजूर झालेल्या निधीतून या शाळेची नवीन भव्य इमारत उभारण्यात येणार आहे.

राज्यातील तळागाळातील विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण पोहोचण्यासाठी भारतीय जनता पार्टी,महायुती सरकार कटिबद्ध राहून काम करत आहे. भविष्यात कोणीही शिक्षणापासून वंचित राहणार नाही.याची काळजी सरकारने घेतली आहे. ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे (भाऊ) यांनी विद्यार्थी केंद्रस्थानी ठेवून शाळा विकसित करणे, हा मुख्य उद्देश ठेवला आहे. जिल्हा परिषद शाळेतूनच विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा पाया घातला जातो. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सोयी सुविधा युक्त व दर्जेदार शिक्षण मिळावे म्हणून संपूर्ण राज्यभरात दर्जेदार इमारती उभ्या राहत आहेत शाळांच्या नूतन इमारतीचे काम लवकरच बांधकाम पूर्ण होऊन ही तांत्रिकदृष्ट्या परिपूर्ण अशी सुसज्ज इमारत शाळेतील विद्यार्थ्यांना उपलब्ध होईल. एका चांगला समाजाचा पाया विद्यार्थ्यांच्या चांगल्या जडणघडणीतून उभारला जातो जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या नूतन इमारतीमध्ये विद्यार्थ्यांना अधिक चांगल्या पद्धतीने गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळण्यासाठी विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.माझी शाळा आदर्श शाळा उपक्रमांतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये चांगले शिक्षण देण्यात येत आहे. राज्य शासन गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी विविध उपक्रम राबवित आहे. या शाळांमधून गुणवंत विद्यार्थी घडतील व विविध क्षेत्रांमध्ये नावलौकिक मिळवतील,असा विश्वास सौ. सोनिया गोरे यांनी व्यक्त करून विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी मा. जिल्हा परिषद सदस्य श्री.सिद्धनाथ नागरी पतसंस्थेचे चेअरमन श्री.अरुण गोरे (आबा), भाजपा सातारा जिल्हा मा.उपाध्यक्ष किसन सस्ते, म्हसवड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे साहेब, श्री प्रकाश कापसे यांच्यासह गावातील सरपंच उपसरपंच,ग्रामपंचायत सदस्य, भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते , ग्रामस्थ, मुख्याध्यापक शिक्षक, विद्यार्थी व स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

बोपर्डी ग्रामपंचायत ता.वाई चा मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान स्पर्धेत सहभाग-शंकर गाढवे

Post Views: 71 बोपर्डी ग्रामपंचायत ता.वाई चा मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान स्पर्धेत सहभाग-शंकर गाढवे वाई प्रतिनिधी -महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री समृद्ध

Live Cricket