शेतकऱ्यांच्या खात्यात २,००० रुपयांचाच हप्ता जमा
मुबंई -केंद्र सरकारने नमो शेतकरी योजनेअंतर्गत पैसे जमा केल्यानंतर तब्बल 1 महिन्यानंतर आता राज्य सरकारनेही शेतकऱ्यांच्या खात्यात २,००० रुपयांचाच हप्ता जमा केला आहे.
विधानसभा निवडणुकीत शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ तसेच केंद्र सरकारच्या नमो शेतकरी सन्मान योजनेत भर टाकून शेतकऱ्यांना 15 हजार रुपये देऊ असे आश्वासन दिले होते. त्यामुळे राज्य शासनाच्या रकम 2 हजार ऐवजी 3 हजार दिली जाईल अशी आशा होती मात्र हेही आश्वासन फसवे ठरले आहे. कारण शेतकऱ्यांना 2 हजार रुपयेच देण्यात आले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘नमो शेतकरी महासन्मान निधी योजने’च्या अंतर्गत 91,65,156 शेतकऱ्यांना ₹1892.61 कोटींच्या 7व्या हप्त्याचे वितरण. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार व मंत्रिमंडळतील इतर सदस्य उपस्थित होते.
