बालेवाडी (पुणे)येथे झालेल्या महाराष्ट्र राज्य जूनियर मैदानी स्पर्धेत सातारा जिल्हा संघास 14 पदके.
बालेवाडी (पुणे) येथे 2 ते 5 सप्टेंबर दरम्यान झालेल्या महाराष्ट्र राज्य ज्युनिअर मैदानी स्पर्धेत सातारा जिल्हा ॲथलेटिक्स संघाने उज्वल कामगिरी केली या स्पर्धेत जिल्हा संघाने 1 सुवर्ण 10 रौप्य व 3 कांस्यपदकासह 14 पदके मिळवली या स्पर्धेत महाराष्ट्रातील इतर सर्व जिल्ह्यांचे संघ सहभागी झाले होते.14 16 18 व 20 या वयोगटातील मुले व मुलींसाठी या स्पर्धा घेण्यात आल्या होत्या.
या स्पर्धेत14 वर्षाखालील मुलांच्या गटात आलोक बर्गे याने triathlon B या खेळ प्रकारात रौप्य पदक मिळवले, मुलींच्या गटात श्रावणी कांबळे हिने triathlon A या खेळ प्रकारात रौप्य पदक मिळवले,14 वर्षाखालील मुलींच्या मिडीले रिले या संघाने कांस्यपदक मिळवले या संघात सई घाडगे,अनुष्का निकम,हंसिका तुपे,श्रेया सावंत यांचा समावेश होता.
16 वर्षाखालील मुलींच्या गटात श्वेता सिताफ हिने भालाफेक खेळ प्रकारात रौप्य पदक,अनुष्का निकम हिने pentathlon या खेळ प्रकारात रौप्य पदक मिळवले,
16 वर्षाखालील मुलांच्या गटात हर्षवर्धन पवार Pentathlon खेळ प्रकारात रौप्य पदक मिळवले.
18 वर्षाखालील मुलांच्या गटात वेदांत मोरे याने लांब उडी खेळ प्रकारात सुवर्णपदक पदक मिळवले,
याच गटात रज्जाक तांबोळी याने उंच उडी या खेळ प्रकारात रौप्य पदक मिळवले,
साहिल सोनवणे 5000मी चालणे खेळ प्रकारात रौप्य पदक मिळवले,
18 वर्षाखालील मुलींच्या गटात दुर्वा शेवाळे हिने भालाफेक खेळ प्रकारात रौप्य पदक मिळवले.
20 वर्षाखालील मुलांच्या गटात यश शिंदे याने Decathlon या खेळ प्रकारात रौप्य पदक मिळवले.
20 वर्षाखालील मुलींच्या गटात अपूर्वा बोटे हिने तिहेरी उडी या खेळ प्रकारात रौप्य पदक मिळवले याच गटात प्रांजल साळुंखे हिने थाळीफेक व गोळा फेक या दोन्ही खेळ प्रकारात कांस्यपदक मिळवली. या स्पर्धेसाठी संघ व्यवस्थापक म्हणून अनिकेत बोबडे सर यांनी काम पाहिले या स्पर्धेत यशस्वी झालेल्या सर्व खेळाडूंचे सातारा जिल्हा ॲम्युचर ॲथलेटिक्स असोसिएशनचे अध्यक्ष पांडुरंग शिंदे व सर्व सदस्यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
