Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » ५ सप्टेंबर ‘शिक्षक दिन’

५ सप्टेंबर ‘शिक्षक दिन’ 

५ सप्टेंबर ‘शिक्षक दिन’ 

नवी दिल्ली : भारताचे माजी राष्ट्रपती, तत्त्वज्ञ, महान शिक्षक आणि विद्वान डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन ५ सप्टेंबर रोजी येतो. त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ हा दिवस संपूर्ण देशभर ‘शिक्षक दिन’ म्हणून साजरा केला जातो.

१९६२ साली, डॉ. राधाकृष्णन यांना जेव्हा राष्ट्रपतीपदाची जबाबदारी देण्यात आली, तेव्हा त्यांच्या शिष्यांनी व सहकाऱ्यांनी त्यांचा वाढदिवस विशेष पद्धतीने साजरा करण्याची विनंती केली होती. त्यावेळी त्यांनी नम्रपणे सांगितले – “माझा वाढदिवस साजरा करण्यापेक्षा तो दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा झाला तर मला अधिक आनंद होईल.” त्यानंतरपासून ५ सप्टेंबर हा दिवस शिक्षकांविषयी कृतज्ञता आणि आदर व्यक्त करण्याचा दिवस ठरला.

देशभरात या दिवशी विद्यार्थ्यांकडून शिक्षकांचा सन्मान केला जातो, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते तसेच शिक्षण क्षेत्रात मोलाचे योगदान देणाऱ्या शिक्षकांचा गौरव केला जातो.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

बोपर्डी ग्रामपंचायत ता.वाई चा मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान स्पर्धेत सहभाग-शंकर गाढवे

Post Views: 232 बोपर्डी ग्रामपंचायत ता.वाई चा मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान स्पर्धेत सहभाग-शंकर गाढवे वाई प्रतिनिधी -महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री समृद्ध

Live Cricket