सातारा गॅझेटिअरबाबत निर्णय न झाल्यास रस्त्यावर फिरू देणार नाही; मनोज जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
मनोज जरांगे पाटील पुढे म्हणाले की, कोणी कितीही आमच्यात संभ्रम निर्माण केला. तरी माझा समाज कोणावर विश्वास ठेवत नाही आणि मी देखील कोणावर विश्वास ठेवत नाही. कारण माझ्या समाजाला माहित आहे की जे आता बोंबलत आहेत, संभ्रम निर्माण करत आहेत हे आधी कुठे झोपलेले होते? हे आधी का येत नाहीत? बैठकांना बोलवल्यावर येत नाहीत. मुंबईत बोलवल्यावर येत नाहीत, हे कशातच नसतात. हे फक्त टीव्हीवर असतात. मला हे अभ्यासक बोलवायचे देखील नव्हते. मराठा समाजाची देखील हीच इच्छा होती. पण, मुंबईतील काही बांधव बोलले की, आपण त्यांना विश्वासात घेऊन सोबत घेतले पाहिजे त्यामुळे त्यांना बोलावले. परंतु हे संभ्रम निर्माण करतात. मराठा समाजात संभ्रम निर्माण होणार नाही. मी मराठवाड्यातला सर्व मराठा समाज आरक्षणात घालणार आहे. थोड्याच दिवसात मराठ्यांना हे दिसणार आहे. त्यामुळे मराठ्यांनी संभ्रम निर्माण करून घेऊ नये. पश्चिम महाराष्ट्रात असलेल्या सातारा गॅझेटिअरबाबत देखील सरकारने हयगय करता कामा नये, जर हे झाले नाही तर तुम्हाला मी पुन्हा रस्त्यावर फिरणे बंद करेल, असा इशारा त्यांनी यावेळी राज्य सरकारला दिला.
