Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » केळघर येते पर्यावरणपूरक गणेश विसर्जन

केळघर येते पर्यावरणपूरक गणेश विसर्जन

केळघर येते पर्यावरणपूरक गणेश विसर्जन

केळघर -प्रतिनिधी जिल्हा परिषदेच्या वतीने यंदा पर्यावरण पूरक गणेश विसर्जन करण्यात यावे असे आवाहन जिल्ह्यातील नागरिकांना करण्यात आले होते. नदीत गणेश विसर्जन न करता पर्यायी जलकुंडात गणेश विसर्जन करावे यामुळे प्रदूषण टाळता येते असे आवाहन जिल्हा परिषदेने केले होते.

त्या आवाहनाला प्रतिसाद देत येथील शुभम दिलीप गाडवे यांनी आपल्या घरातील गणेशाचे विसर्जन घरच्या घरी पर्यावरण पूरक पद्धतीने पाण्याच्या मोठया भांड्यात केले.यावेळी उपसरपंच शंकर बेलोशे,ज्ञानेश्वर बेलोशे, आनंदा बेलोशे, दिलीप गाडवे, अक्षय बेलोशे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. या पर्यावरणपूरक गणेश विसर्जनाचे ग्रामस्थांनी कौतुक केले.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

बोपर्डी ग्रामपंचायत ता.वाई चा मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान स्पर्धेत सहभाग-शंकर गाढवे

Post Views: 231 बोपर्डी ग्रामपंचायत ता.वाई चा मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान स्पर्धेत सहभाग-शंकर गाढवे वाई प्रतिनिधी -महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री समृद्ध

Live Cricket