वाई अर्बन बँकेच्या कर्ज योजनांचा लाभ घ्या – डॉ. सुधीर बोधे
वाई – वाई अर्बन बँकेने चारचाकी कार व दुचाकी वाहन खरेदी करणा-यांसाठी साडेआठ टक्के इतका माफक व्याजदर केलेला आहे. बँकेने कमी व्याजदरात सुरू ठेवलेल्या कर्ज योजनांचा खातेदारांनी लाभ घ्यावा, असे आवाहन वाई अर्बन परिवाराचे श्रेष्ठी डॉ. सुधीर बोधे यांनी केले.
बँकेच्या पाचगणी शाखेच्यावतीने आयोजित वाहन वितरणप्रसंगी व्यापारी अशोक चिकणे यांना टाटा पंच व अजय चोपडे यांना थार गाडीचे वितरणप्रसंगी डाँ. बोधे बोलत होते. , ते म्हणाले, बँकेने अलिकडील काळात कर्जावरील व्याजदर कमी केलेले आहेत. अशा आकर्षक व्याजदरांचा लाभ घेऊन व्यापारी, उद्योजक, नोकरदार यांनी बँकेकडून कर्ज घेऊन घर खरेदी, वाहन खरेदी करावी. वाई अर्बन बँकेच्या सातारा, पुणे, सांगली व रायगड या जिल्ह्यांमध्ये 27 शाखा कार्यरत असून शाखांच्या परिसरांतील व्यापारी, नोकरदार व आर्थिक सक्षम व्यक्तींनी बँकेशी संपर्क साधून विविध कर्ज व ठेव योजनांचा फायदा घ्यावा.
बँकेचे पाचगणी शाखा व्यवस्थापक श्री. मिलिंद हिरवे म्हणाले, बँकेने वैयक्तिक वापरासाठीच्या चारचाकी व दुचाकी वाहनांसाठी कर्ज व्याजदर साडेआठ टक्के इतका केला आहे. घर बांधणे, घर विकत घेणे, फ्लॅट खरेदी करणे यासाठी नऊ टक्के तर व्यापा-यांना व्यवसायात भांडवलासाठी टर्म लोन घेणेसाठी बारा टक्के इतका व्याजदर आकारणी सुरू केली आहे. बँकेने व्याजदर कमी केल्याने अनेक खातेदार या कर्ज योजनांचा फायदा घेत आहेत. व्यावसायिक वाहन कर्जासाठी साडेअकरा टक्के तर कॅशक्रेडीट कर्जासाठी तेरा टक्के, विविध वस्तू, यंत्रे खरेदीसाठी बारा टक्के व्याजदराने कर्जपुरवठा केला जात आहे. त्यासाठी जवळच्या शाखेशी संपर्क साधावा, असे आवाहन केले. याप्रसंगी बँकेच्या अधिकारी सौ. माधुरी मुसळे, अमित जाधव, गौरी चिकणे, सचिन काळे, राजेंद्र जायगुडे आदी उपस्थित होते.
