Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » साहित्यिक ग्रंथसंपदा » दीपलक्ष्मी पतसंस्थेच्या शाहूपुरी शाखेने वर्धापन दिना दिवशी आयोजित केलेला भेटवस्तू वाटप कार्यक्रम स्तुत्य उपक्रम : शिरीष चिटणीस

दीपलक्ष्मी पतसंस्थेच्या शाहूपुरी शाखेने वर्धापन दिना दिवशी आयोजित केलेला भेटवस्तू वाटप कार्यक्रम स्तुत्य उपक्रम : शिरीष चिटणीस 

दीपलक्ष्मी पतसंस्थेच्या शाहूपुरी शाखेने वर्धापन दिना दिवशी आयोजित केलेला भेटवस्तू वाटप कार्यक्रम स्तुत्य उपक्रम : शिरीष चिटणीस 

सातारा दि.2 : (प्रतिनिधी)दीपलक्ष्मी पतसंस्थेच्या शाखा शाहूपुरी ने सामाजिक बांधिलकी बांधिलकी जपत वर्धापन दिना दिवशी आयोजित केलेला भेटवस्तू वाटप कार्यक्रम हा स्तुत्य उपक्रम आहे. असे प्रतिपादन संस्थेचे संस्थापक – चेअरमन शिरीष चिटणीस यांनी दीपलक्ष्मी पतसंस्था शाखा शाहूपुरी च्या 23 व्या वर्धापन दिना दिवशी आयोजित केलेल्या छोटे खाणी भेटवस्तू वाटप कार्यक्रमात केले. सदरचा कार्यक्रम संस्थेच्या स्व:वास्तुत आयोजित करण्यात आला होता.

 सदर कार्यक्रमास संस्थेचे संस्थापक- चेअरमन शिरीष चिटणीस, संचालक आप्पा शालगर, जगदीश खंडागळे तसेच व्यवस्थापक विनायक भोसले, सह. व्यवस्थापक व शाखाधिकारी रवींद्र कळसकर, शाखाधिकारी अभिनंदन मोरे, आग्नेश शिंदे, लक्ष्मण कदम, जनार्दन निपाणे उपस्थित होते.

यापुढे बोलताना ते म्हणाले दीपलक्ष्मी पतसंस्था समाजामध्ये करत असलेल्या आपल्या सर्व समावेशक,आदर्शवत कामाने तसेच सामाजिक बांधिलकीपोटी करत असलेले विविध उपक्रमाने आपल्या कार्याचा आलेख दिवसेंदिवस उंचावत आहे. संस्था सहकारात काम करत असताना दैनंदिन व्यवहार करता अत्याधुनिक उपकरणाच्या साह्याने संस्थेच्या खातेदारांना अविरत सुविधा देण्यासाठी कटिबद्ध आहे. तसेच संस्था खातेदारांच्या पाल्यांसाठी सुद्धा  

करिअर गायडन्स करून त्यांना दिशा देण्याचा प्रयत्न करते. अशा अल्पावधीत नावारूपास आलेल्या संस्थेच्या शाहूपुरी शाखेच्या प्रगतीचा आढावा घेताना म्हणाले संस्थेच्या या शाखेने 4 कोटी 20 लाख रुपयेच्या ठेवी समाजातून गोळा केले असून 3 कोटीचे रुपये समाजातील गरजू व्यक्तींना वाटप केले आहे. व तरल ते पोटी 1 कोटी 20 लाख रुपयाची गुंतवणूक विविध बँकेमध्ये केली. तसेच या संस्थेने एकूण 40 कोटी रुपयाच्या ठेवीचा टप्पा जवळपास गाठला आहे.  या शाखेने यशस्वी 23 वर्षे पूर्ण केली असून 24 वर्षात शाखा पदार्पण करत आहे.

सदर कार्यक्रम प्रसंगी दत्तात्रय भोसले, अरविंद सकुंडे, पुष्पा रजपूत धनंजय जगताप,राजेश ननावरे, रामचंद्र चव्हाण, प्रमोद बल्लाळ, प्रमोद चव्हाण, संदीप मराठे, आबा पालेकर तसेच प्रवीण सपकाळ, रविराज जाधव शुभम बल्लाळ, उपस्थित होते.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

बोपर्डी ग्रामपंचायत ता.वाई चा मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान स्पर्धेत सहभाग-शंकर गाढवे

Post Views: 175 बोपर्डी ग्रामपंचायत ता.वाई चा मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान स्पर्धेत सहभाग-शंकर गाढवे वाई प्रतिनिधी -महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री समृद्ध

Live Cricket