Home » देश » धार्मिक » मराठा आरक्षणासाठी उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेची महाआरती

मराठा आरक्षणासाठी उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेची महाआरती

मराठा आरक्षणासाठी उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेची महाआरती

महाबळेश्वर: मराठा समाजाला लवकरात लवकर आरक्षण मिळावे आणि या प्रश्नाचा तिढा सुटावा, यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेच्या वतीने शहरातील हनुमान मंदिरात महाआरती करण्यात आली. महाविकास आघाडीमधील अनेक प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते.

या महाआरतीमध्ये शहर शिवसेनेचे प्रमुख राजाभाऊ गुजर, राष्ट्रवादीचे शहरप्रमुख बाळासाहेब पवार, मनसेचे शहरप्रमुख राजेश शिंदे, युवा सेनेचे शहरप्रमुख आकाश साळुंखे, उपशहरप्रमुख राजेश साळवी यांच्यासह राजेश कुंभारदरे, रमेश शिंदे, ॲड. संजय जंगम, किसनराव खामकर, अशोक शिंदे, दत्ता बावळेकर, राजाभाऊ बोधले, अरुण बावळेकर, अनिल जाधव, मनीष मोहिते, शुभम कुंभारदरे, गजाभाऊ मोरे, सतीश साळुंखे, सुशांत पारठे, संकेत धोत्रे, ओंकार गुजर, साहिल घाडगे, सोहम घाडगे, ऋषिकेश चिकणे आणि पार्थ गुजर आदींसह अनेक नागरिक सहभागी झाले होते.

या वेळी उपस्थित सर्वच पदाधिकाऱ्यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा दर्शवला आणि शासनाने यावर तातडीने तोडगा काढण्याची मागणी केली. महाआरतीनंतर ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय’, ‘जय भवानी जय शिवाजी’ आणि ‘एक मराठा लाख मराठा’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. या वेळी मराठा आंदोलनाला पाठिंबा देत, लवकरात लवकर हा प्रश्न मार्गी लागावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

बोपर्डी ग्रामपंचायत ता.वाई चा मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान स्पर्धेत सहभाग-शंकर गाढवे

Post Views: 235 बोपर्डी ग्रामपंचायत ता.वाई चा मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान स्पर्धेत सहभाग-शंकर गाढवे वाई प्रतिनिधी -महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री समृद्ध

Live Cricket